एक्स्प्लोर
In Pics : पुणे तिथे काय उणे! पुण्यात भारतातील सगळ्यात खोल भुयारी मेट्रो स्टेशन; पाहा फोटो...
शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची खोली जमिनीच्या 108फूट खाली (33.1 मीटर) एवढी असून, शिवाजीनगर भूमिगत स्थानक देशातील सर्वाधिक खोल स्थानक ठरले आहे.
PUNE
1/8

शिवाजीनगर भूमिगत स्थानकाची खोली जमिनीच्या 108फूट खाली (33.1 मीटर) एवढी असून, शिवाजीनगर भूमिगत स्थानक देशातील सर्वाधिक खोल स्थानक ठरले आहे.
2/8

शिवाजीनगर बहुउद्देशीय वाहतूक केंद्राची विविध कामांनीही वेग घेतला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या १७ किलोमीटर आणि वनाज ते रामवाडी या १६ किलोमीटर अंतराच्या दोन मार्गिकांची कामे सुरू आहेत.
3/8

या दोन्ही मार्गिका शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकात एकमेकांना एकत्र येणार आहेत.
4/8

मा मार्गावरुन काही दिवसांपूर्वी मेट्रो ट्रायल रन पार पडली होती.
5/8

भूमिगत स्थानकाचे छत 95फूट उंच असून तेथे थेट सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
6/8

या प्रकारचे वैशिष्ट्य असलेले हे एकमेव स्थानक आहे.
7/8

स्थानकाचा एकूण परिसर 11 एकर असून स्थानकामध्ये येण्या-जाण्यासाठी एकूण सात दरवाजे असतील. पार्किंगची सुविधाही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
8/8

सध्या या स्थानकाच्या कामांनी वेग घेतला असून येत्या काही दिवसांत ही सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील, असा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे.
Published at : 19 Jan 2023 08:39 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















