एक्स्प्लोर
Baramati : बारामतीत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या 18 खाजगी अकॅडमींना टाळे
Baramati News : बारामतीतील मोहसीन पठाण हे बेकायदेशीर अकॅडमीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते.
Baramati News
1/6

बारामती शहरात नगरपरीषदेच्या प्रशासनाने वारंवार सूचना करुन देखील नियमांचे उल्लंघन करणे खाजगी अकॅडमीचालकांना महागात पडले आहे.
2/6

वारंवार लेखी सूचना करूनही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित न करणाऱ्या अकॅडमीवर बारामतीत नगरपरिषद प्रशासनाने टाळे ठोकले आहे.
3/6

बारामती शहरातील 18 अकॅडमीला टाळे ठोकण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
4/6

बारामतीतील मोहसीन पठाण हे बेकायदेशीर अकॅडमीवर कारवाई व्हावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यानंतर तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठकित कारवाईचा निर्णय घेण्यात आला.
5/6

या बैठकीनंतर शहरात ज्या अकॅडमी नियमबाह्य आहेत त्यांच्यावर कारवाई करावी असे आदेश मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी अग्निशमन दलाचे पर्यवेक्षक पद्मनाथ कुल्लरवार यांना दिले होते.
6/6

अनेक अकॅडमीने अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला मिळण्यासाठी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
Published at : 25 Oct 2023 11:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र























