एक्स्प्लोर
Vijay Shivtare On Ajit Pawar : जेजुरीवर जाऊन भंडारा उचलला, विजय शिवतारे म्हणाले, राक्षसी प्रवृत्तीचा वध करणार!
Vijay Shivtare At Jejuri : शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढण्याची घोषणा केली. यानंतर विजय शिवतारे जेजुरी गडावर गेले आणि तिथे त्यांनी खंडोबाचं दर्शन घेतलं.
शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा लढण्याची घोषणा केली. शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तुफान हल्ला चढवला. नीच, उर्मट अजित पवार असा उल्लेख करत, शिवतारे यांनी पाच वर्षांची भडास काढली. आज सासवडमध्ये पत्रकार परिषद घेऊन, अजित पवारांवर घणाघाती टीका केली. यानंतर विजय शिवतारे जेजुरी गडावर गेले आणि तिथे त्यांनी खंडोबाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना पुन्हा एकदा बारामती लोकसभा लढवण्याचा निर्धार व्यक्त केलाच, शिवाय राक्षसाचा वध मार्तंडने केला त्याच राक्षसी प्रवृत्ती विरोधात मी लढतो आहे असं स्पष्ट केलं. (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
1/9

विजय शिवतारे म्हणाले, "राक्षसाचा वध मार्तंडने केला त्याच राक्षसी प्रवृत्ती विरोधात मी लढतो आहे. 41 वर्ष पवारांनी सत्ता राबवली त्यांच्या विरोधात मी लढतो आहे. माझ्यावर टीका करत आहेत त्यांना मी सांगू सांगू इच्छितो की इथली स्थानिक समीकरणं वेगळी आहेत" (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
2/9

बारामतीमध्ये अजित पवारांच्याबाबत नाराजी आहे. आता इथला सर्व्हे करावा, सुनेत्रा पवारांना मतदान होणार नाही, त्याचा फायदा सुप्रिया सुळे यांना झाला असता, असा दावा विजय शिवतारे यांनी केला. (छायाचित्र सौजन्य : एबीपी माझा प्रतिनिधी)
Published at : 13 Mar 2024 07:15 PM (IST)
आणखी पाहा























