एक्स्प्लोर
'माझ्या लहानपणी वाढदिवसाला गुळ शेंगदाणे किंवा गुळ खोबरं दिलं जायचं', शरद पवार युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा करताना काय काय म्हणाले?
Sharad Pawar : 'माझ्या लहानपणी वाढदिवसाला गुळ शेंगदाणे किंवा गुळ खोबरं दिलं जायचं', शरद पवार युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा करताना काय काय म्हणाले?
Sharad Pawar
1/6

Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत युगेंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी युगेंद्र पवार यांच्याविषयी भाष्य केलं. शिवाय केक कापून वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवर देखील शरद पवार भरभरुन बोलले आहेत.
2/6

शरद पवार म्हणाले, तुम्हा सर्वांची इच्छा आहे, माझ्या उपस्थितीत केक कापावा, आनंद आहे. मला हजर राहाता आलं.
3/6

मी विचार करत होतो की, जमाना किती बदलतोय. लहान गावी सुद्धा आता केक येऊ लागले आहेत. केक कापायला लागले. लोक त्यामध्ये रस घेऊ लागले. माझ्या लहानपणी वाढदिवसाला गुळ शेंगदाणे किंवा गुळ खोबरं दिलं जायचं. आता ते सगळं बदललं आहे.
4/6

पण एक लोक गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही राजकारण करतो तेव्हा सरकार आमच्या हाती असायचं. युगेंद्र काम करत असताना सरकार त्याच्या हाती नाही.
5/6

त्याच्या हातात कष्ट करायचे, लोकांशी संपर्क ठेवायचं एवढंच आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी आहे.
6/6

सत्तेची अपेक्षा लोकांनी करता कामा नये. आता एकट्याचं अभिनंदन किती दिवस करायचं, आम्हाला अक्षदा टाकूद्या...
Published at : 22 Apr 2025 05:17 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















