एक्स्प्लोर
Petrol-Diesel : देशभरात पाण्यासाठी नाही तर चक्क 'पेट्रोल'साठी कॅन घेऊन रांगा!
Petrol-Diesel : मालवाहतूकदारांच्या संपात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा...
Petrol diesel
1/10

हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. (Photo Credit : PTI)
2/10

या संपामुळे पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची बातमी पसरताच देशभरात पेट्रोल पंपावर चक्क 'पेट्रोल'साठी कॅन घेऊन रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं! (Photo Credit : PTI)
3/10

हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातल्या मालवाहतूकदारांनी संप पुकारण्यात आला आहे, त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसल्याचं दिसून येतंय. (Photo Credit : PTI)
4/10

पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा पुरवठा कमी होत असल्याने अनेक भागात पेट्रोल मिळेनासं झालं. (Photo Credit : PTI)
5/10

पेट्रोल न मिळण्याची शक्यता गृहीत धरून अनेक भागात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी लोकांनी गर्दी केली.(Photo Credit : PTI)
6/10

दुसरीकडे वाहतूकदारांच्या संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली, यामुळे भाजीपाला महाग होऊ शकतो. (Photo Credit : PTI)
7/10

परराज्यातून येणाऱ्या गाड्या कमी आल्या. राज्यातून 400 ते 425 गाड्याच एपीएमसीत आल्या. नेहमीपेक्षा 100 ते 150 गाड्यांची आवक कमी झाली. त्यामुळे भाजीपाला 20 ते 25 टक्के महागला. (Photo Credit : PTI)
8/10

अनेक भागात पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने स्कूलबसही रस्त्यावर येऊ शकल्या नाहीत. (Photo Credit : PTI)
9/10

संपाचा मोठा परिणाम एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर झाला. (Photo Credit : PTI)
10/10

एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बहुतांश भागात झालेला नाही त्यामुळे घरगुती ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिक यांना या संपाचा मोठा फटका बसलाय. (Photo Credit : PTI)
Published at : 03 Jan 2024 11:28 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























