एक्स्प्लोर
शहापूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; परभणीच्या दोघांचा मृत्यू, 7 गंभीर जखमी; ट्रकच्या धडकेत क्रुझरचा चक्काचूर
Samruddhi Expressway Accident: शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर पहाटे महामार्गावर मोठी खळबळ उडाली होती.
Accident
1/7

शहापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.
2/7

ही दुर्घटना वाशिंद आणि आमने दरम्यान पहाटेच्या सुमारास घडली.
3/7

मृतांमध्ये अब्दुल पाशा शेख (वय 65) आणि जाहीद सिद्दिकी (वय 40) यांचा समावेश आहे. अपघातग्रस्तांमध्ये 2 लहान मुले, 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असून त्यातील दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
4/7

ही मंडळी परभणी जिल्ह्यातून भिवंडीतील नातेवाईकांकडे येत असताना हा अपघात घडला. अपघातानंतर जखमींना तात्काळ भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
5/7

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
6/7

मृतदेहांचे पंचनामे करून शवविच्छेदनासाठी भिवंडीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून, या प्रकरणाचा सखोल तपास शहापूर पोलीस करीत आहेत.
7/7

या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
Published at : 19 Jun 2025 11:54 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
व्यापार-उद्योग
नवी मुंबई
महाराष्ट्र
























