एक्स्प्लोर
Vadhavan Port : वाढवण बंदराच्या कामाला मच्छीमारांचा विरोध, डहाणूत बोटींवर काळे फुगे लावत समुद्रात निषेध रॅली
Vadhavan Port : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रस्तावित वाढवण बंदराच्या कामाचं भूमिपूजन पालघरमधील सिडकोच्या मैदानवर करणार आहेत. मात्र, स्थानिक मच्छीमारांचा या बंदराच्या विस्ताराला विरोध आहे.
![Vadhavan Port : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रस्तावित वाढवण बंदराच्या कामाचं भूमिपूजन पालघरमधील सिडकोच्या मैदानवर करणार आहेत. मात्र, स्थानिक मच्छीमारांचा या बंदराच्या विस्ताराला विरोध आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/c2e7ac3f82edaf01ce7abb114d84d1a51724997383955989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डहाणूमध्ये मच्छीमारांकडून निषेध रॅली
1/6
![पालघर येथील वाढवण बंदराच्या निषेधार्थ स्थानिक मच्छीमारांनी काळे झेंडे फडकावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघरमध्ये दाखल होणार आहेत. मच्छीमार आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या बोटीत काळे फुगे लावलेले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/a4d5ff24c9afdaf36e4f75300aeefb6dcc61f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालघर येथील वाढवण बंदराच्या निषेधार्थ स्थानिक मच्छीमारांनी काळे झेंडे फडकावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पालघरमध्ये दाखल होणार आहेत. मच्छीमार आक्रमक झाले असून त्यांनी आपल्या बोटीत काळे फुगे लावलेले आहेत.
2/6
![डहाणू खाडीत बोटींवर काळे फुगे लावून मच्छीमारांनी निषेध केलेला आहे. या बंदराच्या कामाच्या विरोधात संघर्ष समिती आणि मच्छीमारांकडून आंदोलनं करण्यात आलेली होती. मात्र, केंद्रानं हा प्रकल्प करण्यावर ठाम भूमिका घेतली.मच्छीमारांकडून अनोख्या पद्धतीनं काळे फुगे बोटींवर लावून विरोध करण्यात आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/279759ece265bf55f599a2f93835964b354f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डहाणू खाडीत बोटींवर काळे फुगे लावून मच्छीमारांनी निषेध केलेला आहे. या बंदराच्या कामाच्या विरोधात संघर्ष समिती आणि मच्छीमारांकडून आंदोलनं करण्यात आलेली होती. मात्र, केंद्रानं हा प्रकल्प करण्यावर ठाम भूमिका घेतली.मच्छीमारांकडून अनोख्या पद्धतीनं काळे फुगे बोटींवर लावून विरोध करण्यात आला आहे.
3/6
![एका बाजूला देशाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या वाढवण बंद राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असताना दुसरीकडे मात्र स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांचा विरोध कायम आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/e13927ab10090642648173f08ebae92715c31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका बाजूला देशाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या वाढवण बंद राज्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असताना दुसरीकडे मात्र स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांचा विरोध कायम आहे.
4/6
![आज ही डहाणू आणि परिसरामध्ये वाढवण बंदराच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी समुद्रामध्ये आपल्या बोटींना काळे फुगे आणि झेंडे लावून आंदोलनाला सुरुवात केली आहे. धाकटी डहाणू गावातील (पालघर) येथील मच्छीमार बांधवांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजनाविरोधात निषेधार्थ काळे झेंडे, काळे फुगे बोटीवर लावून रॅली काढली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/568cb174a9eba8656706dd1c282e7ec87fbe3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज ही डहाणू आणि परिसरामध्ये वाढवण बंदराच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी समुद्रामध्ये आपल्या बोटींना काळे फुगे आणि झेंडे लावून आंदोलनाला सुरुवात केली आहे. धाकटी डहाणू गावातील (पालघर) येथील मच्छीमार बांधवांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजनाविरोधात निषेधार्थ काळे झेंडे, काळे फुगे बोटीवर लावून रॅली काढली.
5/6
![वाढवण बंदरामुळं मच्छीमार समाज उध्वस्त होणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायाला मूकणार आहोत. जवळजवळ 25 ते 30 कुटुंब प्रभावित होणार आहेत. पालघरमध्ये वाढवण येथे जे बंदर होणार आहे तो मच्छीमारांसाठी गोल्डन बेल्ट आहे. प्रत्यक्ष ते अप्रत्यक्षपणे 5 ते 10 लोकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचं भूमिपुत्रांनी म्हटलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/1476a135e8cf8e7f26e3f59908a1c0c122eda.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढवण बंदरामुळं मच्छीमार समाज उध्वस्त होणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायाला मूकणार आहोत. जवळजवळ 25 ते 30 कुटुंब प्रभावित होणार आहेत. पालघरमध्ये वाढवण येथे जे बंदर होणार आहे तो मच्छीमारांसाठी गोल्डन बेल्ट आहे. प्रत्यक्ष ते अप्रत्यक्षपणे 5 ते 10 लोकांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचं भूमिपुत्रांनी म्हटलं.
6/6
![1996 पासून वाढवण बंदराचा घाट शासनाकडून घातला जात आहे. आज भूमिपुजनाचा कार्यक्रम होत आहे त्याचा आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करत आहोत, असं मच्छीमारांनी म्हटलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/6e9fa269f0c3fc89c54dc126b10e80bc2ce56.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1996 पासून वाढवण बंदराचा घाट शासनाकडून घातला जात आहे. आज भूमिपुजनाचा कार्यक्रम होत आहे त्याचा आम्ही काळे झेंडे दाखवून निषेध करत आहोत, असं मच्छीमारांनी म्हटलं.
Published at : 30 Aug 2024 11:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)