एक्स्प्लोर

नाशिकच्या मूकबधीर जोडप्याची यशोगाथा, पाणीपुरी स्टॉल उभारुन परिस्थितीला झुकवलं

Nashik Pani Puri : दिव्यांगत्वावर (Disabled) मात करून हे जोडपे नाशिककरांना (Nashik) भुरळ घालणारी पाणी पुरी (Panni Puri) खाऊ घालत आहे.

nashik

1/10
अनेक जणांना हातपाय असूनही अनेकदा बिकट परिस्थितीसमोर हातपाय लुळे पडतात. मात्र लाख संकट डोळ्यासमोर असली तरी नेटाने सामना करून परिस्थितीला आपल्यापुढं झुकायला भाग पाडणारे देखील अनेकजण जिद्दीनं उभं राहतात. नाशिकमधील (Nashik) असेच एक जोडपे सध्या अनेकांचे प्रेरणास्थान बनत आहे.

2/10
दिव्यांगत्वावर मात करून हे जोडपे नाशिककरांना भुरळ घालणारी पाणी पुरी (Panni Puri) खाऊ घालत आहे.

3/10
उम्मीद पे दुनिया कायम है' याच म्हणीला प्रत्यक्षात साकारण्याचे धाडस या दोन्ही दिव्यांग (Disabled) पती पत्नीने केले आहे.

4/10
कोरोना काळात शिक्षकाची नोकरी सुटल्याने परिस्थितीशी दोन हात करत नाशिकच्या गजबजलेल्या परिसर असलेल्या जत्रा हॉटेल (Jatra Hotel) जवळ पाणी पुरीचा स्टॉल उभा केला. आणि आज परिसरासह नाशिक शहरातून अनेक जण पाणी पुरीचा आस्वाद घेण्यासाठी येथे जात असतात.

5/10
नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरात किशोर कडेकर (Kishor Kadekar) यांचे कुटुंबीय राहते. किशोर यांना जन्मापासून बोलता, ऐकता येत नसल्याने त्यांचे शिक्षणही यायचं माध्यमातून झाले. पुढे त्यांनी राहत असलेल्या ठिकाणी कपडे इस्त्रीचा व्यवसाय सुरु केला. याच सुमारास त्यांना मुंबईत (Mumbai) दिव्यांग शाळेत शिक्षकाची नोकरी लागली.

6/10
यामुळे कडेकर कुटुंब मुंबईला स्थायिक झाले. शिक्षकांच्या नोकरीतून घर संसार चांगला सुरु होता. अशातच कोरोनाने जगभरात शिरकाव केला. आणि किशोर यांना नोकरी सोडावी लागली. त्यानंतर ते कुटुंबासह पुन्हा नाशिकमध्ये आले. कोरोनाचे वातावरण असताना नोकरी नाही, व्यवसाय नाही. सर्वच डबघाईला आल्याने संसाराचा गाडा कसाबसा चालू होता.

7/10
अशातच वर्षभरानंतर कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होण्यास सुरवात झाली. निर्बध काही अंशी शिथिल झाले. म्हणजेच २०२० च्या सुमारास कडेकर कुटुंबीयांनी उदरनिर्वाहासाठी पाणीपुरी व्यवसाय करण्याचे ठरविले

8/10
पत्नी मनीषा कडेकर यांनी देखील किशोर यांच्या कल्पनेला दाद दिली. त्यानंतर जत्रा हॉटेल परिसरात पाणी पुरीचा गाडा उभा केला. मात्र महिना दोन महिने होत नाही तोच कोरोनाची दुसऱ्या लाटेने थैमान घातले. यामुळे जॅम बसलेला व्यवसाय मोडकळीस आला. शेवटी कडेकर कुटुंबाला पुन्हा घरी बसावे लागले. मात्र त्यानंतर कडेकर कुटुंबाला स्टॉल उभारण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागली. अखेर 2021 मध्ये तो दिवस उजाडला.

9/10
किशोर कडेकर हे आपल्या पत्नीसह सध्या किशोर पाणी पुरी सेंटर चालवितात. विशेष म्हणजे दोघेही मूकबधिर असूनही त्यांनी आपला ग्राहकवर्ग जोपासला आहे. हे जोडपे हाताच्या जेश्चरद्वारे ग्राहकांना काय हवे नको ते विचारात असते. जोडपे मूकबधिर असल्याने सुरवातीला लोकांना समजावण्यात अधिक वेळ वाया जात असायचा. त्यावेळी त्यांचा मुलगा अनेकवेळा ग्राहकांशी संवाद साधण्यासाठी असायचा, मात्र आता परिसरातील नागरिकांनी कडेकर कुटुंबियांशी संवाद साधण्याची जणू सवयच झाली आहे. त्यामुळे या दोघांचा देखील जम बसत गेला आहे.

10/10
नाशिकच्या जत्रा हॉटेल परिसरात किशोर पाणी पुरी सेंटर नावाचा स्टॉल उभा करण्यात आला आहे. यामध्ये पाणी पुरी भेळपुरी, रगडा पॅटिस सह इतर पदार्थ तयार केले जातात. हे सर्व पदार्थाला लागणारे साहित्य हे कडेकर कुटुंब स्वतः घरी बनवितात. शिवाय नवख्या ग्राहकांसाठी संवाद साधण्यासाठी किंवा ऑर्डर देण्यासाठी विशेष पद्धतीचे मेनूकार्ड तयार करण्यात आले आहे. त्यावर बोट ठेवून ऑर्डर दिली जाते.

बातम्या फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी

रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण

Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaMamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर

संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील

Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार

Embed widget