एक्स्प्लोर
Top Google Search in 2024: हिना खान, निमरत कौरला गूगल सर्च लिस्ट 2024 मध्ये स्थान; बॉलिवूड-टॉलिवूड कुणाकुणाचा समावेश?
Top Google Search in 2024: गुगल ग्लोबल सर्च लिस्ट 2024 मध्ये हिना खान, निम्रत कौरनं अनेक बड्या स्टार्सना मागे टाकत टॉप 10 मध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. या यादीत एका साऊथ सुपरस्टारचाही समावेश आहे.

Google Search in 2024
1/7

हिना खान : हिना खान एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. जी सध्या ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजवर आहे. यामुळेच हिनाचं नाव या यादीत सामील झालं आहे.
2/7

हिनानं स्वतः सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर करून तिला कॅन्सर असल्याची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये तिनं अनेक फोटोही शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती आईच्या मांडीवर डोकं ठेवून बसली होती.
3/7

हिना खाननं आपल्या अभिनय करिअरची सुरुवात 'ये रिश्ता क्या कहलाता' या हिट टीव्ही शोमधून केली होती. ज्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. आता अभिनेत्रीनं अनेक शो आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
4/7

निम्रत कौर : हिना खानसोबतच बॉलिवूड अभिनेत्री निम्रत कौरचं नावही या यादीत सामील झालं आहे. निम्रत कौरनं अनेक चित्रपटांमध्ये आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे.
5/7

मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ती अभिनेता अभिषेक बच्चनसोबतच्या अफेअरच्या अफवांमुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या अभिषेकपासून विभक्त होत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या तिघांपैकी कोणीही अद्याप यासंदर्भात कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
6/7

पवन कल्याण : बॉलीवूडसोबतच साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणचे नावही गुगलच्या सर्च लिस्टमध्ये सामील आहे. खरं तर हे वर्ष अभिनेत्यासाठी खूप खास ठरलं आहे.
7/7

खरंतर, या वर्षी पवन कल्याणनं अभिनयापासून काही अंतर घेत राजकारणात प्रवेश केला. आता सध्या तो आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान आहे.
Published at : 11 Dec 2024 12:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
छत्रपती संभाजी नगर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
