एक्स्प्लोर
Year Ender 2024: 'कल्कि 2898 एडी'पासून 'पुष्पा 2'पर्यंत; 2024 मध्ये 'या' साऊथ फिल्म्सचा डंका, बॉक्स ऑफिसवरही धुवांधार कलेक्शन
Year Ender 2024: या वर्षी साऊथचे अनेक चित्रपट पडद्यावर आले. 2024 आता निरोप घेणार आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला या वर्षी बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या साऊथ चित्रपटांबद्दल सांगत आहोत.
Year Ender 2024
1/7

विजय थलापतीचा 'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम' हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटानं भारतात एकूण 252.59 कोटींची कमाई केली होती.
2/7

'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरला रिलीज झाला. या चित्रपटानं रिलीजच्या एका आठवड्यातच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 650 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. चित्रपट अजूनही पडद्यावर आहे आणि त्यामुळे त्याचे कलेक्शन वाढू शकते.
3/7

'मंजुम्मेल बॉयज'चं बजेट केवळ 20 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. Sacknilk च्या मते, चित्रपटानं 141.61 कोटींची कमाई केली आणि तो हिट ठरला.
4/7

25 कोटी रुपये खर्चून बनलेला 'आदुजीवितम: द गोट लाइफ' हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटानं भारतात 85.01 कोटी रुपयांची कमाई केली होती.
5/7

दुलकर सलमानचा 'अमरन' हा चित्रपटही सुपरहिट ठरला. या चित्रपटानं 219.23 कोटींची कमाई करून हिट लिस्टमध्ये स्थान मिळवलं आहे.
6/7

या वर्षातील ब्लॉकबस्टर साऊथ चित्रपटांमध्ये प्रभासचा 'कल्की 2898 एडी' अव्वल आहे. 500 कोटींचे बजेट असलेल्या या साय-फाय चित्रपटाचं कलेक्शन 646.31 कोटी रुपये होतं.
7/7

तेजा सज्जाच्या 'हनुमान'चं बजेट फक्त 40 कोटी रुपये होतं. या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 201.63 कोटी रुपयांची कमाई केली आणि तो सुपरहिट ठरला.
Published at : 12 Dec 2024 07:23 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















