एक्स्प्लोर
Nandgiri Fort: गोदावरीच्या काठावरील नांदेडचा 'नंदगिरी किल्ला' घेतोय आकार; पाहा फोटो
Nanded Nandgiri Fort: नांदेडच्या 'नंदगिरी किल्ल्या'ची दुरवस्था झाली असल्याने त्याला पुनर्जिवीत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.
Nanded Nandgiri Fort
1/8

नांदेड शहराचे वैभव जशी गोदावरी नदी आहे, तसेच नंदगिरी किल्लाही आहे.
2/8

मात्र, नंदगिरी किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने गोदावरी नदीच्या काठावर झाडाझुडपांमध्ये लपलेला हा किल्ला घाणीने व्यापला आहे.
3/8

पण असे असतांना या किल्ल्याला पुनर्जिवीत करण्याचे काम कोरोना योद्धा वीर सैनिक ग्रुपच्या पुढाकाराने होत आहे.
4/8

प्रत्येक रविवारी किल्ल्यावर सकाळी तीन-चार तास स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनीही सहभाग घेतला आहे.
5/8

ऐतिहासिक व धार्मिक इतिहास लाभलेल्या नांदेड शहरात हा एक किल्ला आहे.
6/8

या नंदीतटामुळे शहराला नांदेड हे नाव मिळाले, तेथील प्राचीन नंदगिरी किल्ल्याची आज वाईट अवस्था झाली आहे.
7/8

जुन्या नांदेडमधील अरब गल्लीतून नंदगिरी किल्ल्याकडे जाता येते. गोदावरी नदीच्या पात्राकडील भव्य तटबंदी आणि सहा बलदंड बुरुज एवढीच किल्ल्याची ओळख आता शिल्लक आहे.
8/8

सुभेदारी महालासह एकुलती एक तोफही दुर्लक्षित झाली आहे. त्याला मूर्त रूप देण्याचे काम उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव आणि वीर सैनिक ग्रुप करत आहेत.
Published at : 07 Aug 2023 03:41 PM (IST)
आणखी पाहा























