एक्स्प्लोर

West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर

West Bengal : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 

कोलकाता : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केले. पश्चिम बंगालमध्ये यावेळी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिल आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होईल. तर, मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची सत्ता वाचवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तर, भाजपनं देखील पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पश्चिम बंगालची निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल समोर आला आहे. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला धक्का बसताना दिसत आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता आहे. तर, असदुद्दीन ओवेसी यांच्या आघाडीला देखील चांगल्या जागा मिळतील, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम बंगाल कोणाची सत्ता? 

मॅटराईज आयएएनसच्या ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार पुन्हा येऊ शकतं. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीच जितक्या जागा जिंकल्या त्यातुलनेत यावेळी जागा कमी होऊ शकतात. ओपिनियन पोल नुसार तृणमूल काँग्रेसला 155-170 जागा मिळू शकतात. तर, भाजपला 100-115 जागा मिळण्याची शक्यता आहे. या ओपिनियन पोलनुसार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम आघाडीची कामगिरी काँग्रेस पेक्षा चांगली राहू शकते. एमआयएमच्या आघाडीला पाच ते सहा जागा मिळू शकतात. मात्र, काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीतील अंतर कमी राहण्याची शक्यता आहे. टीएमसीला 43-45 टक्के, भाजपला 41 ते 43 टक्के  आणि इतरांना 13 ते 15 टक्के मतं मिळू शकतात. 

पश्चिम बंगालमध्ये ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे. पश्चिम  बंगालमध्ये यावेळी 294 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला 152 जागांवर मतदान होईल. तर, दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला 142 जागांवर मतदान होणार आहे. मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. 

2021 चा निकाल

पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत  तृणमूल काँग्रेसला 48.5 टक्के मतं मिळाली होती. तर, भाजपला 38.5 टक्के मतं मिळालेली. तृणमूल काँग्रेसनं त्यावेळी 213 जागा जिंकलेल्या, तर भाजपनं 77 जागांवर विजय मिळवला होता.    

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट, परीक्षा गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परिक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; ्
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
कपिल सिब्बलांचा सर्वात मोठा डाव, निवडणूक आयोगाचं पितळ उघडं पाडलं, दस्तऐवजावरील सही शिक्काच दाखवला!
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
Embed widget