एक्स्प्लोर

बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रकरणाचे तपास अधिकारी अतुलकुमार लांडगे यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या आहेत.

बीड: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत असलेल्या आणि गुन्हेगारी प्रकरणांनी गाजत असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन महिलेस घरातून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी, महिला आयोगाने दखल घेतली आहे. बीड जिल्ह्यातील हिवरा पहाडी येथील महिला रात्री घरी झोपलेली असताना घरातून उचलून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून रात्रभर गावच्या चावडीवर बांधून ठेवल्याची बातमी माध्यमातून समोर आली आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून तपास अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधला. आता, पीडित अल्पवयीन महिलेच्या विवाहावरुनही गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांनी दिले आहेत.   

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रकरणाचे तपास अधिकारी अतुलकुमार लांडगे यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या आहेत. सद्यस्थितीत पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम  137(2),333,64(2)(i) आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी वैभव पटेकर याला अटक करण्यात आली आहे. या तपासा दरम्यान पीडित मुलीचा गेल्याच वर्षी बालविवाह लावून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या बालविवाहाच्या दृष्टीनेही गुन्हा दाखल करून लग्न लावून देणारे, लग्नास उपस्थित असणारे, पोलीस पाटील, ग्रामसेवक अशा संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत. 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाच्या अध्यक्षा अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

10 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास पीडित महिला आपल्या पतीसोबत घरी झोपलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी घरात शिरला. त्याने महिलेचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर तिला गावाजवळ असलल्या नदीपात्रात नेत तिच्यावर अत्याचार केला असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आरोपीने पीडित महिलेला गावातील चावडीत आणून दोरीनं आणि कपड्यानं बांधून ठेवलं आणि तेथून पसार झाला. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने मदतीसाठी आवाज दिला, मात्र सुरुवातीला तिला कोणीही मदत केली नाही. नंतर तिच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला तिथून सोडवून घरी नेलं. घटनेनंतर आरोपीच्या भीतीमुळे पीडितेने दोन दिवस हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, शेवटी तिने हिम्मत करून आई आणि मामासोबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर, आरोपी वैभव पटेकर यास अटक करण्यात आली असून 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! प.बंगालसह देशाच्या 5 राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर; आयोगाकडून तारीख घोषित

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Shivsena Name And Symbol Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Sangola Drought : सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
सांगोल्यात दुष्काळाची भीषण अवस्था; पेरणी, मेहनत, मशागतीला पैसा घालवला पण... सूर्यफुलानंही माना टाकल्या, सरकारच्या मदतीकडे बळीराजाचे डोळे
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
अमरावती शिक्षक मतदार संघात 26 उमेदवार रिंगणात; महंत सुनील महाराजांसह अखेर महायुतीमधील तिघांची माघार
Nana Patekar Death: नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
नाना पाटेकर मृत्यू प्रकरणात गोव्यात केस दाखल; शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांच्या जबाबांची तपासणी होणार, पोलिसांनी निर्णय का घेतला?
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
Embed widget