एक्स्प्लोर
मोदी @9 साठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मुंबई दौऱ्यावर, सिध्दीविनायकाचं घेतलं दर्शन
अनुराग ठाकूर यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सिध्दीविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली.
Union Minister Anurag Thakur visits Siddhivinayak Temple
1/9

मोदी @ 9 या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आज मुंबई दौऱ्यावर आहेत.
2/9

अनुराग ठाकूर यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात सिध्दीविनायक मंदिरात जाऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली.
3/9

सिद्धविनायक दर्शनानंतर अनुराग ठाकूर प्रख्यात वास्तू विशारद शशी प्रभू, गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि व्यावसायिक बकुल शहा यांची भेट घेतली.
4/9

अनुराग ठाकूर मुंबई आणि आसपासच्या शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद आयोजित करण्यात आला आहे.
5/9

हा कार्यक्रम झाल्यावर ते मुंबईतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देतील.
6/9

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आजचा अनुराग ठाकूर यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
7/9

मोदी सरकारला देशात सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झाली आहेत.
8/9

यानिमित्त भाजपने मोदी @9 हे अभियान हाती घेतंलय. या अभियानाची जबाबदारी केंद्रातील मंत्र्यांकडे देण्यात आली आहे.
9/9

केंद्रीय मंत्री प्रत्येक राज्यात जाऊन मोदी सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर मुंबई दौऱ्यावर आले आहेत.
Published at : 01 Jun 2023 12:17 PM (IST)
आणखी पाहा























