एक्स्प्लोर
Mumbai Traffic: मुसळधार पाऊस अन् वाहतूक कोंडी; मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा, अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी लागतायत अडीच तास
Mumbai Traffic Update : मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज सकाळपासून सुरू असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Mumbai Traffic Update
1/6

Mumbai Traffic Update : मुंबईत आज सकाळपासून सुरू असलेल्या अधून-मधून जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
2/6

बोरिवलीकडून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्गावर सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव दरम्यान ही मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
3/6

गोरेगाव ते सांताक्रुझ 15 ते 20 मिनिटांचा प्रवास मात्र वाहन चालकांना एक ते दीड तासांमध्ये प्रवास करावा लागत आहे. खरंतर सकाळची वेळ आहे. त्यामुळे मोठ्या संख्यामध्ये चाकरमानी कामासाठी निघाले आहेत. मात्र या वाहतूक कोंडीमुळे मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.
4/6

सध्या पश्चिम द्रुतगती महामार्गाची वाहतूक कोंडी काढण्याचे प्रयत्न देखील वाहतूक पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.
5/6

दुसरीकडे, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तीन मोठे ट्रक घाटामध्ये बंद पडल्यामुळे परशुराम घाटात दोन्ही मार्गावर वाहतूक संथगतीने सुरु आहे. परिणामी, घाटात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहे.
6/6

पुढे आलेल्या माहितीनुसार मागील एक तासाहून अधिक काळ घाटातली वाहतूक विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्यामुळे बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे बोललं जात आहे.
Published at : 20 Aug 2025 10:35 AM (IST)
आणखी पाहा























