Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
Gadchiroli Crime: मुंबई येथून संबंधित विभागाने त्यांचा निलंबनाचा आदेश जारी केला असून, या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे

Gadchiroli: वेतन वाढ रोखून कंत्राटी परिचारिकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी मुलचेरा येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. सततच्या मानसिक त्रासाला (Gadchiroli Crime) कंटाळून कंत्राटी परिचारिकेने विष प्राशन करत आत्महत्येचा (Crime) प्रयत्न केला होता. पीडित पीडित परिचारिकेच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली होती. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याची दखल घेत डॉ. विनोद म्हशाखेत्री यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून निलंबन काळात डॉ. विनोद म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती गडचिरोली (Gadchiroli) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी दिली आहे.
ते म्हणाले, "या प्रकरणात जे FIR आणि चौकशी अहवालांची प्रत आपण शासनाकडे पाठवली होती. शासनस्तरावर याची तत्काळ दखल घेऊन, संबंधित तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद म्हशाखेत्रीला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.त्यांची विभागीय चौकशी करण्यात येत आहे. असे डॉ प्रताप शिंदे म्हणाले.
Gadchiroli Crime: नेमकं प्रकरण काय?
गडचिरोलीतील मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रात काम करणारी 45 वर्षीय कंत्राटी परिचारिका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याकडून व्हॉट्सअपवर होत असलेल्या कथित अश्लील आणि त्रासदायक मागण्यांमुळे मानसिकदृष्ट्या ढासळली आणि यातूनच तिने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. सध्या ती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तिच्या जबाबानंतर गडचिरोली पोलिसांनी सोमवारी उशिरा झिरो एफआयआर नोंदवत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हाशाखेत्री यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रात कार्यरत असलेल्या 45 वर्षीय कंत्राटी परिचारिकेकडून व्हॉट्सअप चॅटद्वारे ‘शारीरिक सुखा’ची मागणी केल्याच्या गंभीर प्रकरणात अखेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हाशाखेत्री यांच्यावर तातडीची कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथून संबंधित विभागाने त्यांचा निलंबनाचा आदेश जारी केला असून, या निर्णयामुळे आरोग्य यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























