एक्स्प्लोर
PHOTO: ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीचा इतिहास आणि राजकीय महत्त्व काय?
ठाण्याच्या टेंभी नाका (Thane Tembhi Naka) इथली देवी यावर्षी सर्वात जास्त चर्चेत आहे. ठाण्याची दुर्गेश्वरी असे नाव असलेल्या या देवीचा इतिहास आणि राजकीय महत्त्व त्यासाठीच जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Thane Tembhi Naka Durgeshwari Devi History Anand Dighe Eknath Shinde Shiv sena
1/10

ठाण्याच्या टेंभी नाका (Thane Tembhi Naka) इथली देवी यावर्षी सर्वात जास्त चर्चेत आहे आणि याचे कारण देखील शिवसेनेमध्ये (ShivSena) पडलेली उभी फुट हेच आहे.
2/10

ठाण्याची दुर्गेश्वरी असे नाव असलेल्या टेंभी नाका इथल्या देवीचा इतिहास आणि राजकीय महत्त्व त्यासाठीच जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेला नवरात्र उत्सव म्हणजेच टेंभी नाका इथला नवरात्र उत्सव. 1978 सालापासून या उत्सवाची सुरुवात स्वर्गीय आनंद दिघे (Anand Dighe) यांनी केली. श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेकडून हा उत्सव आयोजित केला जातो. या देवीच्या मूर्तीचे देखील एक वैशिष्ट्य आहे. आनंद दिघे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली. तीच आणि तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे.
Published at : 29 Sep 2022 08:39 AM (IST)
आणखी पाहा























