एक्स्प्लोर
PHOTO : मुंबईत पावसाचा कहर! तीन दुर्घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू, सखल भागात पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प
nalasopara
1/11

मुंबईत पावसाचा कहर सुरु असून चेंबूर, विक्रोळी आणि भांडुप या तीन ठिकाणी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
2/11

चेंबूरमध्ये दरड कोसळून संरक्षण भिंत घरावर पडल्यानं 11 जणांचा मृत्यू झाला आहे. (Photo source- ANI)
3/11

घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.(Photo source- ANI)
4/11

घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.(Photo source- ANI)
5/11

धारावीतमध्ये अशा पद्धतीनं रस्त्यावर पाणी साचलं आहे.
6/11

बोरीवलीत रस्त्यांना नदीचं रुप प्राप्त झालं होतं. गाड्यात पाण्यात वाहत असलेल्या दिसून आलं.(Photo source- ANI)
7/11

सायन सर्कलला तलावाचं रुप आलं होतं. लोकं कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत घरी पोहोचत होते. (Photo source- ANI)
8/11

सायन रेल्वे स्थानकाला देखील तलावाचं रुप आलं होतं. स्थानकात अशा पद्धतीनं पाणी साचलं होतं.(Photo source- ANI)
9/11

सायन रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसून आलं. (Photo source- ANI)
10/11

कांदिवली पूर्व भागामध्ये मुसळधार पावसानंतर घरांमध्ये मोठ्या प्रमाणारवर पाणी शिरलं. (Photo source- ANI)
11/11

नालासोपारा भागात देखील जोरदार पावसानं रस्ते पाण्याखाली गेले होते.
Published at : 18 Jul 2021 08:53 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
महाराष्ट्र
मुंबई






















