एक्स्प्लोर
Maratha Morcha In Mumbai: मराठा आंदोलनाची राज्यभरात जय्यत तयारी; धाराशिवमधून 12 हजार गाड्या मुंबईकडे निघणार, जालन्यातून नाश्त्याचे विशेष नियोजन
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा दिला आहे.
Maratha Morcha In Mumbai
1/5

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातुन मराठा समाज बांधव मुंबईला जाण्याच्या तयारीत असुन धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावात जोरदार तयारी करण्यात आली.
2/5

मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या अंतरवाली सराटी जवळील साष्ट पिंपळगाव येथे सरपंच आणि स्थानिक नागरिकांनी आंदोलकांच्या नाश्त्या पाण्यासाठी गरमा गरम पालक पुऱ्यांची सोय केलीय. आजपासून ही तयारी सुरू झाली असून मुंबई मार्गावर जाणाऱ्या सर्व आंदोलकांना निघताना या नाश्त्याचा आस्वाद घेता येणार आहे.
3/5

त्यामुळे स्थानिक नागरिक आणि सरपंचांनी आचारी लावून मुंबई मार्गावर असणाऱ्या आंदोलकांची पोटापाण्याची सोय केल्याचं पाहायला मिळतेय.
4/5

धाराशिव जिल्ह्यामधून 12 हजार गाड्या गॅस, तांदूळ, तेल सर्व साहित्य घेऊन पंधरा दिवसाचे स्वयंपाकाच साहित्य घेऊन मुंबईकडे निघणार आहे. तर जिल्ह्यातून जवळपास 50 हजारांवर अधिक मराठा बांधव आंदोलनात सहभागी होणार, असा अंदाज आहे.
5/5

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून मराठा समाज बांधव मुंबईला जाण्याच्या तयारीत असुन धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावात जोरदार तयारी करण्यात आली. आंदोलनासाठी खास ट्रॅक्टर तयार केली असून त्यामध्ये पंधरा दिवसाच्या स्वयंपाकसह सर्व नियोजन आहे.
Published at : 25 Aug 2025 01:15 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























