एक्स्प्लोर

PHOTO : वसई तालुक्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारे

Kalamb Beach Vasai

1/7
1अर्नाळा - वसई तालुक्यातील एक मोठं बंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ अशी अर्नाळाची ओळख. अर्नाळा बीचवर जाण्यासाठी मुबलक प्रमाणात वाहतूक व्यवस्था असल्याने पर्यटकांची पावलं अर्नाळा बीचकडे वळतात. अर्नाळा बीचपासून जवळच समुद्रात अर्नाळा हा सागरी किल्ला आहे. अर्नाळा बंदरातून बोटीने अर्नाळा किल्ल्यात जाता येते. कसे जाल? - विरार रेल्वे स्थानकात उतरावे. विरार पश्चिमेला एसटी किंवा वसई-विरार परिवहन सेवेच्या बसने अर्नाळा गावात उतरावे. अर्नाळा गावात जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकातून रिक्षा देखील उपलब्ध होतात.

2/7
2. नवापूर - अर्नाळापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला एक शांत बीच तो म्हणजे नवापूर. नवापूर हे एक निसर्गरम्य गाव असून बीचजवळच विविध फुलांची शेती केली जाते. खासकरून सायंकाळच्या वेळी या बीचवर अत्यंत रम्य वातावरण असते. कसे जाल? - नवापूर बीचला जाण्यासाठी विरार रेल्वे स्थानकातून वसई–विरार परिवहन सेवेची नवापूर बस पकडावी. नवापूर गावात उतरल्यावर चालत साधारण अर्धा किलोमीटर अंतर पार केल्यावर नवापूर बीचला पोहोचाल.

3/7
3. राजोडी - वसई तालुक्यातील राजोडी समुद्रकिनारा हा देखील आता पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. कारण तुम्हाला वॉटर स्पोर्टस् ॲक्टिव्हीटी आवडत असतील तर तुमच्यासाठी हा बीच नक्कीच एक उत्तम डेस्टिनेशन ठरू शकतो. या बीचवर अनेक साहसी खेळांचा अनुभव घेता येतो. कसे जाल? - राजोडी बीचला जाण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून वसई विरार परिवहन सेवेची बस पकडावी.

4/7
4. कळंब - वसई तालुक्यातील शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा अशी कळंबची ओळख आहे. समुद्रकिनारा विस्तीर्ण आणि दूरपर्यंत उथळ असल्याने समुद्रात पोहण्याचा आनंद घेता येतो. सायंकाळी सूर्यास्ताचा देखावा अतिशय मन मोहून टाकतो. कसे जाल? - कळंब बीच गाठण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून कळंब गावात जाणारी बस पकडावी. तिथून पुढे चालत जावे लागते. खासगी वाहन किंवा रिक्षाने थेट कळंब बीचपर्यंत जाता येतं.

5/7
5. भुईगाव - भुईगाव हा वसईतील शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. या बीचवर दाट सुरूचे वन आहे. अनेकजण प्री वेडिंग शूटसाठी या बीचला पसंती देतात. समुद्रकिनाऱ्यावर असलेली सुरुच्या झाडांची हिरवळ मन मोहून टाकते. कसे जाल? - भुईगाव बीचला जाण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून वसई-विरार परिवहन सेवेची भुईगाव बस पकडावी.

6/7
6. रानगाव - रानगाव हा ही एक शांत समुद्रकिनारा आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी इथले वातावरण अत्यंत रम्य होऊन जाते. कसे जाल? - रानगाव समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकातून रिक्षा पकडावी.

7/7
7. सुरुची बीच - नावाप्रमाणेच या बीचवर सुरुची झाडे आहेत. वसईच्या दक्षिणेला हा बीच आहे. खासकरून प्रेमी युगूलांसाठी हा समुद्रकिनारा विशेष आकर्षण आहे. कसे जाल? - सुरुची बीचला जाण्यासाठी वसई रेल्वे स्थानकातून भास्कर आळी बस पकडावी.

मुंबई फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महिला जीएसटी अधिकाऱ्यासह खासगी कर सल्लागाराला 60 हजारांची लाच घेताना अटक, जालना ACB ची कारवाई

Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला

राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ

L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार

नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Embed widget