एक्स्प्लोर
Shivrajyabhishek : छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना! वारली कलेतून साकारला शिवराज्याभिषेक सोहळा
Shivrajyabhishek Warli Painting : चित्रकार कौशिक जाधव यांनी वारली चित्रकलेतून अत्यंत सुंदर रित्या महाराज्यांचा शिवराज्याभिषेक सोहळा रेखाटलं आहे.
Shivrajyabhishek Warli Painting | Kaushik Jadhav
1/10

6 जून रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता.
2/10

आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होत आहे. 6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले.
3/10

आज 6 जून... आज तारखेनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे.
4/10

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक यांनी सुंदर कलाकृती साकारली आहे.
5/10

कौशिक दिलीप जाधव यांनी वारली चित्रकलेतून शिवराज्याभिषेक सोहळा रेखाटला आहे. ही कलाकृती बनवताना वॉटर कलर्सचा वापर केला आहे.
6/10

शिवराज्याभिषेक सोहळ्याची वारली पेंटींग काढण्यासाठी त्यांनी एक तासाचा कालावधी लागला.
7/10

कौशिक जाधव यांनी पहिल्यांदा वारली चित्रकला काढून छत्रपती शिवाजी महाराज्यांना मानाचा मुजरा आपल्या कलाकृतीतून दिलेला आहे.
8/10

चित्रकार कौशिक जाधव यांनी ही कलाकृती साकारण छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली आहे.
9/10

आज राज्यासह देशात शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
10/10

महाराष्ट्रातसह देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले आहेत. यंदाचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार पडत आहे.
Published at : 06 Jun 2023 11:52 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























