एक्स्प्लोर
Mahashivratri 2024 : जेजुरीत तीन गुप्तलिंग अखेर दर्शनासाठी खुले! वर्षातून एकदाच होते दर्शन, यामागील धारणा जाणून घ्या
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त आज सकाळपासून गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी जेजुरीला भाविकांनी मोठी गर्दी केलीये. खंडेरायाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच शिखरामध्ये ही गुप्तलिंग आहे
Mahashivratri 2024 marathi news Three Guptalings in Jejuri
1/6

Mahashivratri 2024 : महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या गडावर म्हणजेच जेजुरी गडावर महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे. या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या मंदिरात असणारी तीन गुप्तलिंग वर्षातुन फक्त एकदाच दर्शनासाठी खुले केले जातात..
2/6

महाशिवरात्रीनिमित्त आज सकाळपासून गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीये. खंडेरायाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच शिखरामध्ये ही गुप्तलिंग आहे. गुप्तलिंग वर्षात फक्त एकच दिवस उघडले जाते.
3/6

भुलोक, पाताळलोक, स्वर्गलोक अशा तिनही लोकांची एकाच दिवशी महाशिवरात्रीला दर्शन होत असल्याची श्रद्धा भाविकांची आहे..
4/6

महाशिवरात्रीला गडावर लाखो भाविक गुप्तलिंगाच्या आणि खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात.. मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
5/6

माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्री, या दिवशी जेजुरी गडावरील मुख्य मंदिरातील तळघरातील खंडोबाचे गुप्तलिंग दर्शनासाठी उघडले जाते. मंदिराचे कळसामधील लिंग हे दर्शनासाठी उघडले जाते,
6/6

संपूर्ण वर्षात केवळ महाशिवरात्र आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच या लिंगाचे दर्शन मिळत असल्याने असंख्या भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात.
Published at : 08 Mar 2024 08:23 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
नाशिक























