एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? याबाबतची माहिती आदिती तटकरे यांनी सभागृहात दिली.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana नागपूर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली. या लक्षवेधीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील,  काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना योजनेबाबत प्रश्न विचारले. सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकाराबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली. 

कोण काय म्हणालं? 

सुनील प्रभूंनी बोगस लाभार्थ्यांची जिल्हावार यादी वाचून दाखवली

लाडकी बहीण योजनेला कोणताही विरोध नाही. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न विचारले होते, असं सुनील प्रभू म्हणाले. लाडकी बहीण योजनेत शासनानं केलेल्या पडताळणीत महिलांच्या नावाने 14998 पुरुषांनी दरमहा 1500 रुपये प्रमाणे 10 महिने लाभ घेतला, त्यांच्यावर काय कारवाई झाली?  महिलांच्या योजनेंवर पुरुषांनी कसा डल्ला मारला? 14998 पुरुषांची नावं कशी घुसवली? 8 हजार बोगस लाभार्थी ते कोण आहेत? एकूण बोगस लाभार्थ्यांची संख्या 26  लाख इतकी असून त्यापोटी 5136 कोटी 30 लाख रुपये  जे पुरुषांना गेले ते सरकार परत घेणार आहे का? असा सवाल सुनील प्रभू यांनी केला.

पुण्यात 2 लाख 4 हजार लाभार्थी बोगस, ठाण्यात 135300 बोगस लाभार्थी, अहिल्यानगरमध्ये 125756 बोगस लाभार्थी, नाशिकमध्ये 186800 बोगस लाभार्थी, संभाजीनगरमध्ये 104700,कोल्हापूरमध्ये  114000, मुंबई उपनगरात 113000, नागपूरमध्ये 95500, रायगडमध्ये 63000, बीडमध्ये 71000 आणि लातूरमध्ये 59 हजार बोगस लाभार्थी सापडले आहेत.  लाडकी बहीण योजनेंतर्गत  5136  कोटी 30 लाख रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला. जो घोटाळा ज्यानं केला त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे? बोगस नोंदणी झाली, ज्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली त्यांच्यावर शासन काय कारवाई करणार आहे? आर्थिक घोटाळ्याची चौकशी करुन, श्वेतपत्रिका काढून याची माहिती महाराष्ट्राच्या जनतेला शासन माहिती देणार का असा प्रश्न आहे, असं सुनील प्रभू म्हणाले.

आदिती तटकरे काय म्हणाल्या? 

लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन फॉर्म 2 कोटी 63 लाख 83589 फॉर्म होते. यापैकी  2 कोटी 43 लाख 82936 फॉर्म विभागानं ग्राह्य धरले, असं आदिती तटकरे म्हणाल्या. 26 लाखाच्या आकडेवारीचा उल्लेख केला ती क्रॉस वेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाली होती. एखादा विभाग एखादी योजना आणतो तेव्हा त्यांच्याकडे दुसऱ्या विभागाचा डेटा नसतो.  नमो शेतकरी महासन्मान योजनेचा डेटा कृषी विभागाकडे होता. कृषी विभागाकडून डेटा जानेवारी 2025 ला मिळाला, त्याच्यात नमो शेतकरी  आणि लाडकी बहीणचे कॉमन लाभार्थी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांना लाडकी बहीणचे 500 रुपये दिले जाऊ लागले, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

महिला व बाल विकास विभागाला माहिती व तंत्रज्ञान विभागानं 26 लाखांचा डेटा दिला. त्या डेटातील 4 लाखांपर्यंतचा डेटा होता, ज्याला रिवाईज स्क्रुटिनीची गरज होती. इतर पात्र लाभार्थी होते, त्यांना लाभ सुरु आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली. 

8 हजार शासकीय कर्मचारी होते, ते नियमानुसार लाभ घेऊ शकत नव्हते. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं त्यानुसार रिकव्हरी सुरु आहे, असं आदिती तटकरेंनी म्हटलं. 

अनेक महिलांचं स्वत:चं वैयक्तिक बँक खाते नाही हे समोर आलं. त्या भाऊ, पती, वडिलांच्या खात्यांवर घेत होते. महिलांचं स्वतंत्र खातं नसल्यानं लाभासाठी घरातल्या पुरुषांचं खातं दिलं होतं, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली. ई-केवायसी सुरु केलं त्यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागला. ई- केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्यात सुरळीत पणा यात दिसून येईल, असंही आदिती तटकरेंनी म्हटलं. 1 कोटी 74 लाख महिलांची ई केवायसी झाल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली. 31 डिसेंबरपर्यंत ई केवायसीसाठी मुदत असल्याचं तटकरे म्हणाल्या. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी नाव मंजूर करण्यापूर्वी केवायसी करायला पाहिजे होती, असं म्हटलं. या योजनेतून नावं कमी करायची आहेत त्यामुळं अटी नंतर आठवल्या आहेत, असं यांनी सांगितलं. यावर उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयात सर्व अटी होत्या. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana Palash Muchchal: स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana Palash Muchchal: स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
स्मृतीने दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं, 40 लाख बुडवल्याच्या आरोपानंतर बालपणीच्या मित्राचे पलाश मुच्छलवर गंभीर आरोप
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Live blog updates: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
Embed widget