एक्स्प्लोर
Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची रिपरिप सुरु
पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळाला आहे. पाण्याअभावी पीकं माना टाकू लागली होती. अशा पिकांना आता जीवदान मिळणार आहे.
Maharashtra Rain News
1/9

राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
2/9

काही भागात जोरदार पावसामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहेत.
3/9

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुार विविध भागात पावसाची हजेरी
4/9

नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे.
5/9

राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली. त्याचबरोबर वाशिम, नंदुरबार, पुणे, नाशिक जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली.
6/9

वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. या
7/9

या पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर होती. त्या पिकांना पावसामुळं जीवदान मिळालं आहे.
8/9

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आला होता.
9/9

नाशिकच्या कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात चणकापूर,आंबुर्डी,जामशेत, अभोणा आदी भागात जोरदार पाऊस झाला.
Published at : 09 Sep 2023 09:01 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























