एक्स्प्लोर
Rain : राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी
Maharashtra Rain : सध्या राज्यातील काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. मात्र, राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे.
maharashtra Rain
1/9

सध्या राज्यातील काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे.
2/9

सध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु आहे. त्याचबरोबर मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरु आहे.
3/9

राज्यातील अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं बळीराजा चिंतेत आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.
4/9

विदर्भातील काही जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
5/9

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे माना कुरुमजवळ रेल्वे ट्रॅकवरुन पाणी वाहत असल्याने रेल्वे वाहतूक थांबवली आहे.
6/9

पुन्हा एकदा भंडाऱ्यात दमदार पावसानं हजेरी लावली. मागील अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत होता.
7/9

भंडाऱ्यात दमदार पावसानं शेतकरी सुखावला असून भात पिकाच्या लागवडीला आता वेग आला आहे.
8/9

भंडाऱ्यात जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं वैनगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. नदी काठावरील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
9/9

मुंबईसह उपनगर ठाणे परिसरात जोरदार पावसाची हजेरी.
Published at : 11 Jul 2023 09:54 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























