एक्स्प्लोर
Maharashtra Monsoon : राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, मुंबई आणि मध्य महाराष्ट्रात कोकणात पावसाचा अंदाज
Mansoon Update : महाराष्ट्रात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये दोन दिवसापासूनच पावसाची रिपरिप सुरु आहेत.

Maharashtra Monsoon IMD Update
1/10

मुंबईसह राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे. पुढील 48 तासांत मुंबई, ठाणे मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
2/10

मुंबई आणि मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढील 48 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
3/10

सोमवारी पहाटेपासून राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अखेर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
4/10

मुंबईच्या विविध भागात चांगला पाऊस कोसळत आहे. त्यामुळं हवामान विभाग मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली.
5/10

विकेंडच्या दिवशी पाऊस झाल्याने मुंबईकरांनी पावसाचा मनसोक्त आनंदही घेतला. विविध जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजाही सुखावला आहे.
6/10

वसई, विरार आणि मीरा भाईंदर शहरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. ढगाळ वातावरण असून, वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये अधून मधून पावसाची रिपरिप सुरु आहे.
7/10

मुंबईसह उपनगरात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं.
8/10

काही भागांतील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कुलाबा वेधशाळेने रविवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत 86 मिमी पावसाची नोंद केली. तर उपनगरातील प्रतिनिधी सांताक्रूझ हवामान केंद्राने याच कालावधीत 176.1 मिमी पावसाची नोंद केली, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने (IMD) दिली आहे.
9/10

मुंबईत काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
10/10

image 11
Published at : 26 Jun 2023 02:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
नागपूर
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
