एक्स्प्लोर
Irshalwadi Landslide: इर्शाळवाडी नेमकं कशासाठी प्रसिद्ध आहे? आणि बहुसंख्य लोक दरवर्षी तिथे का जातात? पाहा...
रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोरबे धरणाच्या बाजूला असलेल्या या वस्तीवर दरड कोसळली आहे. पण नेमकं हे गाव कशासाठी प्रसिद्ध होतं, माहित आहे का?
Irshalwadi Landslide
1/13

इर्शाळवाडी हे गाव इर्शाळगडाच्या पायथ्याशी आहे. इर्शाळगड हा महाराष्ट्राच्या दुर्गश्रृंखलेतील महत्त्वाचा किल्ला आहे. इर्शाळवाडी इर्शाळगडामुळेच प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात अनेक ट्रेकर्स, पर्यटक या गडाला भेट देण्यासाठी येतात.
2/13

वीकेंडला इर्शाळगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.
3/13

इर्शाळवाडी हे इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेलं गाव असून या गावातूनच गडासाठीचा चढ सुरू होतो.
4/13

गडाच्या उत्तरेस कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड आहे, तर ईशान्येस माथेरान आहे. गडावरून पश्चिमेकडे मोरबे धरणाचं दृश्य दिसतं.
5/13

इर्शाळगड हा किल्ला रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात असून त्याची उंची 3,700 फूट आहे. मुंबई-पुणे जुना महामार्गावर चौक जवळ मोरबे धरण येथे जाण्यासाठी मार्ग आहे. याच मार्गाने पर्यटक किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचतात.
6/13

अनेक लोक इर्शाळगडावर ट्रेकिंग करण्यासाठी येतात. हा गड सर करण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागतो. हा गड चढण्यासाठी प्रचंड अवघड आहे.
7/13

इर्शाळगडाला 'विशाळगड' असं दुसरं नाव सुद्धा आहे. स्थानिक लोक या डोंगरास जिनखोड या नावाने ओळखतात.
8/13

इर्शाळगड हा किल्ला माथेरानच्या दक्षिणेस आहे आणि पूर्वी या ठिकाणी राहणारे युरोपियन लोक या किल्ल्यास 'सॅडल हिल' या नावाने ओळखायचे.
9/13

इर्शाळगडाच्या माथ्यावर जाण्यासाठी खडक फोडून वाट तयार करण्यात आली आहे. किल्ल्याच्या माथ्याचा चढ थोडा अवघड आहे.
10/13

किल्ल्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे वर असलेलं नैसर्गिक छिद्र, ज्याला मराठी नेढे किंवा इंग्रजीत ‘नीडल्स आय’ असं म्हणतात. सामान्य उंचीच्या माणसाला आरपार जाता येईल असं हे नेढं आहे.
11/13

कडा चढताना अवघड ठिकाणी शिडी तसेच दोरखंडाचा आधार घेऊन वर जावं लागतं. गडाचे सर्वोच्च ठिकाण म्हणजे इर्शाळगड सुळका. इथे पोहोचण्यासाठी गिर्यारोहक कौशल्याने चढतात.
12/13

वीकेंडला इर्शाळगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. बुधवारी रात्री दरड कोसळल्याची घटना घडल्याने यात कोणताही पर्यटक किंवा ट्रेकर अडकलेला नाही.
13/13

मात्र पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झालं आणि अनेकांचा मृत्यू झाला, अनेक घरं उद्धवस्त झाली.
Published at : 20 Jul 2023 05:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























