एक्स्प्लोर
IIM Nagpur : 132 एकरवर कॅम्पस, अत्याधुनिक सुविधा; असं आहे आयआयएम नागपूर
Indian Institute of Management Nagpur
1/12

IIM Nagpur : इंडियन इॅन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या (IIM Nagpur) नव्या इमारत आणि परिसराचे उद्घाटन व लोकार्पण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath kovind) यांच्या उपस्थितीत झालं
2/12

नागपूरच्या मिहान परिसरात 132 एकर भूमीवर आयआयएम नागपूरचे भव्यदिव्य कॅम्पस साकारण्यात आले असून पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
3/12

सध्या 665 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था असून पर्यावरणदृष्टया इमारतीची उभारणी करण्यात आली आहे..
4/12

आयआयएम नागपूर येथे 20 हायटेक क्लासरुम आणि 24 प्रशिक्षण केंद्रे आहेत.
5/12

या शिवाय 400 आसन क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे.
6/12

या नव्या इमारतीच्या दर्शनी भागात धनुर्धारी अर्जुनाचा भव्य पुतळा उभारला असून त्याद्वारे ध्येय निश्चित करुन लक्ष्यवेध हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न आहे.
7/12

आयआयएम नागपूरचे जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले असून विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय उपलब्ध आहे.
8/12

समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप आणि नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारच्या सोयी आहेत.
9/12

देशाचे अगदी मध्यवर्ती शहर असणारे नागपूर आयआयएम या संस्थेमुळे व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या नकाशावर आले आहे.
10/12

इंग्लंड, अमेरीका, कॅनडा, जपान, डेन्मार्क, फ्रान्स या देशातील जागतिक स्तराच्या विद्यापीठांसोबत आयआयएमचे सहभागीत्व आहे.
11/12

जगभरात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या नागपूरचे पहिले सत्र जुलै 2015 पासून सुरु झाले होते.
12/12

परिसरात 665 विद्यार्थी व्यवस्थापन विषयाच्या विविध शाखेमध्ये शिक्षण घेत असून या ठिकाणच्या वर्गखोल्या, त्यांची रचना, जागतिक स्तराच्या असून अद्यावत प्रशिक्षण यंत्रसामग्रीने सज्ज आहेत.
Published at : 08 May 2022 12:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
सोलापूर
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
