जीएसएम सोलार टॅग काय असते? मोबाइल मध्ये असणाऱ्या सिमचा वापर करून पूर्णतः सौरऊर्जेवर चालणारे साडेनऊ ग्रॅम वजनाचे इलेक्ट्रॉनिक्स उपकरण असते. हे टॅग पक्ष्याच्या पाठीवर बांधण्यात येते. यालाच 'जीएसएम टॅग' असे म्हटले जाते. पक्ष्याच्या दिनचर्येवर, हालचाल आणि विहारावर ह्या टॅगमुळे कोणतीही अडचण येत नाही. वजनाने हलके असल्याने पक्षी ते सहज वाहून नेऊ शकतात. ह्या टॅगमध्ये असलेल्या सोलार पॅनेलमूळे जीपीएस प्रणालीद्वारे सतत माहिती देत संदेशवहनाचे कार्य चालू असते. त्याद्वारे त्यांचा अधिवास, हालचाली, त्या परिसराचा अभ्यास, आगमन आणि परतीचा प्रवास व याबाबतची सविस्तर माहिती मिळते.
2/9
पक्ष्यांची मराठी नावे ही त्यांच्या रंग, रूप आणि स्वभाव वैशिष्ट्ये आणि शिकारीच्या पध्दतीनुसार ठरलेली आहेत. पॅलिड हॅरिअर ह्या परदेशी पाहुण्या पक्षाचे नावसुद्धा त्याच्या विहारावर ठरले असून तो आपले अन्न आणि भक्ष्य असलेल्या परिसराभोवतीच सारखा घिरट्या मारत असतो म्हणून त्याला भोवत्या म्हणतात. गवताळ माळरानातील सावज हेरून हरणाच्या चपळतेने, सफाईदारपणे शिकार करण्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला हारिण असेही म्हणतात.
3/9
पक्षी अभ्यासकांनी यंदा सोलापुरातून तीन पक्ष्यांना टॅग लावले असून दोन वयस्क असून तिसरा मात्र साडेचार हजार किमीचा प्रवास करीत आलेले नऊ महिन्याचे पिलू आहे.
4/9
चार वर्षांपूर्वी टॅग लावलेल्या ' गंगी' या 'माँटयुग्यू हॅरीअर' या भोवत्या पक्षी सोलापूर ते कझाकीस्तान असा प्रवास करीत चौथ्यांदा गंगेवाडीत परत आला आहे. पक्षीमित्र नागेश राव यांनी टॅगसह आपल्या कॅमेऱ्यात त्याला कैद केले आहे.
5/9
भोवत्या पक्ष्याला बसविण्यात आलेल्या जीएसएम सिम आणि त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर सह एका पक्ष्याला अडीच लाख रुपये खर्च येतो. भोवत्याच्या अभ्यासासाठी मागील पंधरा वीस दिवसांपासून प्रिन्सिपल इन्व्हेस्टीगेटर टी गणेश आणि प्रशांत, पक्ष्यांसंदर्भात पीएचडी करणारे अर्जुन कन्नन आणि त्यांचे सहकारी चीयान हे तामिळनाडूचे पक्षी अभ्यासक सोलापूर मुक्कामी आहेत. 'एट्री 'या संस्थेच्यावतीने भारतातील राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या पाच राज्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
6/9
स्थलांतर करणाऱ्या या पक्ष्याचा अभ्यास करण्यासाठी बंगळुरु येथील अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी (एट्री) यांनी सोलापुरातील नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कल यांच्या पुढाकाराने जीएसएम सोलार टॅगिंग केले. मागील आठवड्यात ही या संस्थांनी तीन पक्ष्यांना टॅग लावून नान्नज येथील अभ्यारण्यातून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.
7/9
हिवाळ्यात भोवत्या किंवा हारिण पक्ष्यांचे थवे मोठ्या प्रमाणात सोलापुरात येत असतात. कझाकस्तानहून निघालेले हे पक्षी भारतात राजस्थान, गुजरात मार्गे नाशिक आणि सोलापुरात आढळून येतात. पुढे दक्षिण भारतात देखील हे पक्षी प्रवास करित असतात. मात्र त्यांचा अधिकचा मुक्काम हा सोलापुरात आढळून येतो. त्यामुळे पक्षीअभ्यासक सोलापूरला भोवत्या पक्षाचे जंक्शन मानतात.
8/9
चार वर्षात पक्ष्याने विविध ठिकाणी केलेल्या प्रवासावरुन शास्त्रज्ञांच्या अभ्यासात आणखी भर पडली आहे. मागील चार वर्षात या भोवत्या पक्ष्याने सोलापूर ते कझाकस्तान असा एकूण 31 हजार 800 किलोमीटरचा प्रवास केले आहे. या चार वर्षांत हा पक्षी सोलापूर जिल्ह्यात चौथ्यांदा आला आहे. जिल्ह्यातील गंगेवाडी या ठिकाणी हा पक्षी चौथ्यांदा परतला.
9/9
हिवाळ्यात स्थलांतर करीत युरोप, रशिया, कझाकीस्तान येथून चार ते साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करीत अनेक परदेशी पक्षी सोलापुरात येत असतात. यामध्ये हमखास सोलापूरला येणाऱ्या पक्ष्यांमध्ये 'भोवत्या' हा पक्षी आहे. याच भोवत्या पक्ष्याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी मागील चार वर्षांपूर्वी ‘गंगी’ या माँट्युग्यू भोवत्या पक्षाला जीएसएम सोलार टॅग लावण्यात आले होते.