एक्स्प्लोर
PHOTO: यूट्युबचा असाही सदुपयोग! बीडच्या पोरानं मिळवलं कमालीचं यश, होतेय कौतुक
ज्यांना आपले ध्येय गाठायचे असते ते वाटेत येणाऱ्या अडचणी संदर्भात तक्रारी करत बसत नाहीत तर जिद्दीच्या जोरावर यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतात. अशीच काहीशी यशोगाथा आहे अंबाजोगाईच्या विनायक भोसले याची.
beed News Update ambajogai Vinayak Bhosale
1/9

आयुष्यात ज्यांना आपले ध्येय गाठायचे असते ते वाटेत येणाऱ्या अडचणी संदर्भात तक्रारी करत बसत नाहीत तर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचतात.
2/9

अशीच काहीशी यशोगाथा आहे अंबाजोगाईच्या विनायक भोसले याची. कुठलीही शिकवणी न लावता केवळ यू ट्युबवरील अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून विनायक भोसले याने नीट परीक्षेत 595 गुण प्राप्त केले.
3/9

विनायक भोसले यांच्या वडिलांचे 2014 मध्ये अपघाती निधन झाले. तो मूळचा परळी तालुक्यातील सेलू या गावचा आहे.
4/9

मात्र वडिलांच्या निधनानंतर त्याची आईनेच विनायकचे पालन पोषण केले. लोकांच्या घरात जुने भांडी करून आईने विनायकला शिकवले आणि विनायकने सुद्धा त्या आईच्या कष्टाचे चीज केले. विनायकला एक भाऊ आणि एक बहीण आहे. वडिलांच्या अपघाती निधनानंतर विनायकच्या आईने शिक्षणासाठी अंबाजोगाई गाठले.
5/9

मुलाच्या शिक्षणासाठी विनायकच्या आईने भांडी धुणी करायला सुरुवात केली आणि एका छोट्याशा रूममध्ये चार भावंडं अभ्यास करत मोठी झाली.
6/9

सुरुवातीच्या काळात विनायकची आई या सगळ्या मुलांना घेऊन माजलगावमध्ये गेली होती. मात्र माजलगावपेक्षा आंबेजोगाईचे शिक्षण चांगले आहे अशी माहिती मिळाल्याने केवळ मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी माजलगाव सोडले आणि आंबेजोगाईमध्ये आल्या.
7/9

माजलगावमध्ये असताना विनायक सुद्धा जनावरे राखण्याचं काम करत होता. कोचिंग क्लासेस न लावता विनायकने केवळ यू ट्युबवर अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून हे यश मिळवलं आहे. विनायक भोसले याने नीट परीक्षेत 595 गुण प्राप्त केले आहेत. अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर आर्थिक स्थिती अडसर ठरत नाही, याचा प्रत्यय विनायक भोसले याने समाजासमोर ठेवला आहे.
8/9

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विनायकने जिद्दीने यश संपादन केले
9/9

त्याच्या पुढील शिक्षणासाठी 'आधार माणुसकीचा'चे अध्यक्ष संतोष पवार, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थानिक कार्यवाह विपीन क्षीरसागर, भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, सेवानिवृत्त अभियंता परमेश्वर भिसे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी रवी लोमटे यांनी त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.
Published at : 10 Sep 2022 02:17 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















