एक्स्प्लोर
Maharashtra Politics: महायुतीमध्ये धुसफूस! ठिकाण मंत्रालय, विषय रायगड; अदिती तटकरे अजित पवारांच्या दालनातून निघाल्या अन्...
रायगडमधील पालकमंत्रिपदावरुन शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics
1/10

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. अशात आता शिंदेंच्या आमदारांशिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्याची माहिती आहे.
2/10

रायगडचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीनं या बैठकीला उपस्थित राहिले.
3/10

विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या रायगडमधील आमदार अदिती तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांच्या दालनात रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक झाली.
4/10

दरम्यान भरत गोगावले रायगडावर तर , महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे शिंदेंचे आमदार आपल्या मतदारसंघात आहे. त अदिती तटकरे यांनी अजित पवारांच्या दालनात झालेल्या बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीनंतर अदिती तटकरे अजित पवारांच्या दालनातून बाहेर पडल्यानंतर महायुतीमध्ये धुसफूस असल्याची चर्चा सुरु झाली.
5/10

शिंदेंच्या आमदारांशिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्यानं राजकीय वर्तुळात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नाराजीची चर्चा सुरू आहे.
6/10

सदर बैठकीबाबत शिंदे गटाचे रायगडमधील आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली. ही बैठक अधिकृत आहे की नाही याची खात्री नाही. आम्ही तिघं आमच्या मतदारसंघात आहोत. या बैठीबाबत एकनाथ शिंदेंशी चर्चा करणार असं महेंद्र दळवी यांनी सांगितले. तसेच एक-दोन दिवासांत पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल. भरत गोगावले यांनाच पालमंत्री करा, अशी आमची आजही आग्रहाची मागणी आहे, असं महेंद्र दळवींनी सांगितले. त्यामुळे एकनाथ शिंदे आता कोणती भूमिका घेणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
7/10

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. दोन्ही पक्ष पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत.
8/10

राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं होतं. यामुळे जिल्ह्यात नाराजी दिसून आली.
9/10

शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलने केली. शिवसेनेचे जिल्ह्यातील तिनही आमदार तटकरे यांच्या विरोधात आक्रमक झाले.
10/10

इतरही आमदारांंनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. या वादानंतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदी झालेल्या नियुक्तीला तातडीने स्थगिती देण्यात आली.
Published at : 11 Feb 2025 11:52 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
