एक्स्प्लोर
Kolhapur Football : कोल्हापुरात फुटबाॅलप्रेमीच्या अख्ख्या घराच्या भिंतीच पेले, रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुनील छेत्रीच्या पेटिंगने सजल्या!
कोल्हापूरमध्ये फुटबाॅल वर्ल्डकप सुरु झाल्यानंतर चौकाचौकातील बॅनर आणि कटआऊट्सची चर्चा होत असली, तरी एका फुटबाॅलप्रेमीच्या अख्ख्या घराच्या भिंतीच फुटबाॅलपटूंच्या पेटिंगने सजल्या आहेत.
Kolhapur Football
1/10

कोल्हापुरात फुटबाॅल चाहता असलेल्या तुषार घाटगे यांच्या संपूर्ण घराच्या भिंती फुटबाॅलपटूंनी हँड पेंटिंगने सजल्या आहेत.
2/10

तुषार घाटगे यांच्या घराला फुटबाॅलचा वारसा आहे.
3/10

तुषार घाटगेच्या बहिणी तसेच वडिलही फुटबाॅल खेळले आहेत.
4/10

घरातील प्रत्येक भिंतीवर दिएगो मॅरेडोनापासून ते टीम इंडियाचा कॅप्टन सुनील छेत्रीपर्यंत पेटिंग काढण्यात आली आहेत.
5/10

कोल्हापूरला फुटबाॅलची पंढरी समजली जाते.
6/10

फुटबाॅल विश्वचषक सुरु झाल्यापासून कोल्हापुरातील प्रत्येक चौकात बॅनर आणि कटआऊट लागले आहेत.
7/10

रोनाल्डोचा पोर्तुगाल आणि नेमारचा ब्राझील बाहेर पडल्याने फुटबाॅल चाहत्यांची चांगलीच निराशा झाली आहे.
8/10

मात्र, दुसरीकडे मेस्सी अजूनही स्पर्धेत असल्याने त्याचे चाहते मात्र, आनंदात आहेत.
9/10

अर्जेटिंना सेमी फायनलला पोहोचल्यानंतर कोल्हापुरात चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता.
10/10

तुषारच्या घाटगेच्या घरातील हँड पेंटिंग चांगलेच लक्ष वेधून घेतात.
Published at : 12 Dec 2022 01:09 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























