एक्स्प्लोर
Kolhapur Religious Places : कोल्हापूर दर्शनाचा प्लॅन आहे ? मग या 10 धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या !
Kolhapur Religious Places : कोल्हापूर हे केवळ राज्यातील एक प्रमुख शहर नाही, तर या ठिकाणी पौराणिक श्रद्धा असलेल्या अनेक धार्मिक स्थळे आहेत. कोल्हापूरच्या नावाबाबत अशीही एक समजूत आहे की देवी महालक्ष्मीने येथे एका राक्षसाचा वध केल्याने या ठिकाणाला हे नाव पडले. जगभरातील लोकांना कोल्हापुरी हार आणि चप्पल माहीत आहेत. हे शहर महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यापारी केंद्र तसेच धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. आज आम्ही तुम्हाला कोल्हापुरातील काही खास धार्मिक स्थळे आणि मंदिरांबद्दल सांगणार आहोत जिथे प्रत्येक भक्ताला भेट द्यायची असते.
1/10

बिनखांबी गणेश मंदिर - गणेशाचे हे मंदिर भक्तांमध्येही खूप लोकप्रिय आहे. स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट कामामुळे या मंदिराचे वैशिष्ट्य आणखी वाढले आहे. विशेष म्हणजे या मंदिरात एकही खांब नाही म्हणूनच बिनखांबी मंदिर असे म्हटले जाते.
2/10

अंबाबाई मंदिर : अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा, लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पिदार कमानी असलेला, सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत. पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाटमंडप असे नामाभिमान आहे.
Published at : 08 Jun 2022 06:28 PM (IST)
आणखी पाहा























