एक्स्प्लोर

शक्तिपीठचा मुद्दा तापला, एक इंचही जमीन देणार नाही, परभणीत शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांसोबत वादावादी

शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नसल्याची भूमिका परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

Parbhani Shaktipeeth Highwa :  शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन देणार नसल्याची भूमिका परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. प्रशासनकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र, तो असफल झाला आहे. आज जिल्हाधिकारी आणि भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या सोबत शेतकऱ्यांची वादावादी झाली. शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासन  जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. 

 शक्तिपीठला एक इंचही जमीन देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले

परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ बाधित सर्व शेतकऱ्यांची आणि प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी या बैठकीला जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी खासदार संजय जाधव यांच्यासह सर्व अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी मोठ्या संख्येने या बैठकीला विविध पक्ष संघटना व सर्व गावातील शक्तीपीठ बाधित शेतकरी उपस्थित होते. 
या बैठकीत पोलीस आणि महसूल प्रशासनाने सहजपुर येथे दाखवलेल्या दंडेलशाहीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शक्तिपीठला एक इंचही जमीन देणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले यावेळी शेतकऱ्यांच्या भावना सरकार पर्यंत पोचवणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 मार्च रोजी मुंबईत याबाबत बैठक लावली आहे

या बैठकीत शेतकऱ्यांनी पूर्वीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जमीन मोजनीबाबत घेतलेली भूमिका मांडली यावर विद्यमान जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण चिडले आणि काही वेळ शेतकरी आणि जिल्हाधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली. तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे हे भाजपचे कमळ चिन्ह लावून बैठकीला आले यावेळी ही शेतकरी आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेतला आणि तिघेही वादावादी झाली. शेवटी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 मार्च रोजी मुंबईत याबाबत बैठक लावली त्यात भूमिका मांडण्याचे ठरले आहे.

रत्नागिरी-नागपूर हा मार्ग उपलब्ध असताना नवीन शक्तिपीठ महामार्गाची गरज काय? शेतकऱ्यांचा सवाल

शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या प्रमुख हरकतींमध्ये रत्नागिरी-नागपूर हा मार्ग उपलब्ध असताना नवीन शक्तिपीठ महामार्गाची गरज काय, यात 90 टक्के अल्पभूधारक शेतकरी आहेत, महामार्गामुळे शेतीचे दोन भाग होतील आणि शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतील, अशी भीती व्यक्त केली. आमचा जीव गेला तरी चालेल; पण जमीन देणार नाही, अशा संतप्त शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 महत्वाच्या बातम्या:

Shaktipeeth Highway Protest: मोठी बातमी: परभणीत शक्तिपीठ जमीन मोजणी तात्पुरती स्थगित; तरीही आज रास्ता रोको, प्रशासनाच्या दंडेलशाहीचा करणार निषेध

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
प्रिंटिंगचा शोध जेवढा मोठा तितकाच AI तंत्रज्ञानाचा शोधही मोठा, पण त्याचे दुष्परिणाम होणार : राजीव खांडेकर 
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना मोठी दुर्घटना, कराडमध्ये मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून दोन मजुरांचा मृत्यू
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget