एक्स्प्लोर
हसन मुश्रीफांवर ईडीची दुसऱ्यांदा छापेमारी; समर्थकांचे कोल्हापुरात आंदोलन
Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यामध्ये आज ईडीकडून दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली.

Hasan Mushrif ED Raid
1/8

Hasan Mushrif ED Raid : कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील तसेच पुण्यामध्ये आज ईडीकडून दुसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली.
2/8

कोल्हापुरात हसन मुश्रीफ समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले.
3/8

छापेमारी सुरू करण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानंतर छापेमारीची बातमी वाऱ्यासारखी कागल शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरली.
4/8

यानंतर यानंतर समर्थकांनी जमण्यास सुरुवात केली. त्यांनी भाजपसह केंद्रीय यंत्रणांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणेचा गैरवापर होत वापर होत असल्याचा आरोप केला.
5/8

आमदार सतेज पाटील यांनीही तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपकडून मविआ आमदारांच्या मानसिक खच्चीकरणाचा प्रयत्न असून मुश्रीफांवरील ईडी कारवाई पूर्वनियोजित असल्याचा हल्लाबोल सतेत पाटील यांनी केला.
6/8

पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. केवळ सूडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चित निषेधार्ह आहे.
7/8

महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून अशा खेळी करून केला जात आहे. मुश्रीफ यांच्यावर झालेली ईडीची कारवाई झाली हा सर्व प्रकार पूर्व नियोजित होता हे स्पष्ट आहे.
8/8

ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातो, याचे आजची ही कारवाई म्हणजे एक उदाहरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
Published at : 11 Jan 2023 10:08 PM (IST)
Tags :
Hasan Mushrifअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
