एक्स्प्लोर
14 वर्षाचा देव शहा जिंकला अमेरिकन बी स्पेलिंग चॅम्पियनशीप , कमवले तब्बल 41 लाख रूपये
Dev Shah In Spelling Bee
1/12

नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियनशीप म्हणजे एखाद्या अवघड शब्दाचे स्पेलिंग अचूकरित्या सांगणे. ही चॅम्पियनशीप एकट्याने किंवा ग्रुपने खेळण्याची स्पर्धा आहे.
2/12

अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या देव शाहने 95 वी नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियनशीप जिंकली 2023 आहे. या च्ॅम्पियनशीपमध्ये त्याने तब्बल 41 लाखाचा पुरस्कार मिळाला आहे.
3/12

देव शाह हे अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहतो. तो इयत्ता 8 वीचा विद्यार्थी आहे. त्याची आईही तिथेच राहते.
4/12

2 जून 2023 रोजी, नॅशनल हार्बर, मेरीलँड येथे आयोजित स्क्रिप्स 95 व्या 'नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियनशिप 2023' मध्ये त्यांनी भाग घेतला. जिथे त्याने "Psammophile" हा शब्द अचूकपणे लिहिला आणि अमेरिकी डाॅलर 50,000 चे बक्षीस जिंकले.
5/12

"Psammophile" या शब्दाला हिंदीमध्ये 'सॅमोफाइल' असे म्हणतात आणि 14 वर्षीय देव शाहने त्याचे अचूक स्पेलिंग सांगून यूएसमध्ये 2023 सालासाठी 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी' पुरस्कार आपल्या नावावर केला आहे.
6/12

देव शाह फ्लोरिडा येथील लार्गो येथे राहतो . जिथे त्याचे कुटुंब शिक्षणाला महत्त्व देते आणि त्याच्या शिकण्याला प्रोत्साहन देते. स्पर्धा जिंकल्यानंतर त्याची आईही स्टेजवर आली. तिने सगळ्यांसमोर आपल्या मुलाला मिठी मारली.
7/12

यूएसमधील नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर देव म्हणाला , "हे आश्चर्यकारक आहे... माझे पाय अजूनही थरथरत आहेत... मी गेल्या 3 महिन्यांत अनेक गोष्टींपासून स्वतःला दूर केले होते आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते." या 'त्याग'चे फळ मला मिळाले आहे.
8/12

भारतीय चलनातअमेरिकी डाॅलर 50,000 ची किंमत ही 41 लाखांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच मूळ भारताचा इयत्ता 8 वीचा विद्यार्थी देव शाह याने तेथे 41 लाख रुपयांहून अधिकचे बक्षीस जिंकले आहे.
9/12

देव शाह याची बुद्धिमत्ता आणि बोलण्याचे कौशल्य पाहून तिथे उपस्थित सर्वांनी त्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले. यावेळी अनेक देशांतील विद्यार्थी तेथे उपस्थित होते.
10/12

स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी कॉम्पिटिशन-२०२३ (स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी) ही अत्यंत गाजलेली स्पर्धा आहे, ज्यामध्ये जिंकल्यानंतर देव शहाच्या आनंद गगनात मावत नव्हता.
11/12

देव शाहचे पालक देवल आणि नीलम शाह आहेत. त्यांनी मुलाची हुशारी ओळखली आणि स्क्रिप्स 95 व्या राष्ट्रीय स्पेलिंग बी चॅम्पियनशिप 2023 साठी त्याला प्रोत्साहन दिले. देवचे वडील हे सॉफ्टवेअर इंजिनीअर असून ते 29 वर्षांपूर्वी अमेरिकेत राहायला आले.
12/12

नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियनशिप 2023 मध्ये व्हर्जिनिया ची शार्लोट वॉल्श हीने द्वितीय स्थान पटकावले आहे.
Published at : 03 Jun 2023 07:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
























