एक्स्प्लोर
Congress MLA : 'क्वालिटी' म्हणणाऱ्या काँग्रेस आमदार चर्चेत; कोण आहेत सोफिया फिरादौस
काँग्रेसच्या 32 वर्षीय महिला आमदाराने इतिहास रचला आहे, ओडिशातील बाराबती-कटक विधानसभा मतदारसंघात सोफिया आमदार बनल्या आहेत.

First Muslim MLA Sofia firdous viral video
1/8

काँग्रेसच्या 32 वर्षीय महिला आमदाराने इतिहास रचला आहे, ओडिशातील बाराबती-कटक विधानसभा मतदारसंघात सोफिया आमदार बनल्या आहेत. विशेष म्हणजे ओडिशातील त्या पहिल्या मुस्लीम महिला आमदार आहेत.
2/8

ओडिशा विधानसभेत नुकतेच त्यांनी राज्यातील शिक्षणाचा विषय लावून धरल्याचं पाहायला मिळालं. क्वालिटी एज्युकेशनच्या मुद्द्यावरुन त्यांनी सभागृहात आवाज उठवला होता.
3/8

सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देत राज्याच्या प्रगतीसाठी सर्व शाळा, सर्व कॉलेजमध्ये क्लालिटी एज्युकेशनवर भर दिला जावा, असे त्यांनी म्हटले.
4/8

सोफिया या सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या युवती आमदार असून इंस्टाग्रामवर त्यांचे 1 लाख 29 हजार फॉलोअर्स आहेत. आपल्या राजकीय घटनांबाबत त्या अकाऊंटवरुन व्यक्त होताना दिसून येतात. आताही, त्यांनी विधानसभेतील भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
5/8

येथील विधानसभेत बोलताना त्यांनी राज्यातील क्वालिटी एज्युकेशनवर भर दिला, त्यामुळे, त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
6/8

सोफिया फिरदौस ह्या काँग्रेसचे वरिष्ठ नेता मोहम्मद मोकिम यांच्या कन्या आहेत. त्यांनी भाजप उमेदवार पूर्ण चंद्र महापात्रा यांचा 8,001 मतांनी पराभव करुन आमदारकी मिळवली आहे.
7/8

32 वर्षीय सोफिया यांनी कलिंगा इंस्टीट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नोलॉजी येथून सिविल इंजीनियरिंगची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगळुरू (IIMB) येथून एक्झीक्यूटिव्ह जनरल मॅनेजमेंट प्रोग्रामचेही शिक्षण घेतले आहे.
8/8

सोफिया फिरदौस या विवाहित असून उद्योगपती असलेल्या शेख मेराज उल यांच्यासमवेत त्यांचं लग्न झालं आहे. विशेष म्हणजे ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्र्यांनीही याच विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.
Published at : 01 Sep 2024 04:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रायगड
राजकारण
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
