एक्स्प्लोर
15 लाखांहून अधिक दिव्यांनी शरयू घाट उजळला, पंतप्रधान मोदी रामाचं दर्शन घेऊन दीपोत्सवात सहभागी

pm_narendra_modi
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रामाचं दर्शन घेऊन दीपोत्सवात सहभागी झाले.
2/10

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शरयू घाटावर 15 लाखांहून अधिक दिवे प्रज्वलित करण्या आले.
3/10

यावेळी लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "श्री रामललाचे दर्शन आणि त्यानंतर राजा रामाचा अभिषेक, हे सौभाग्य रामजींच्या कृपेनेच प्राप्त झाले आहे. जेव्हा श्रीरामाचा अभिषेक होतो तेव्हा प्रभू रामाचे आदर्श आणि संस्कारआपल्यात दृढ होतात."
4/10

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात भगवान रामसारखी इच्छाशक्ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
5/10

ते म्हणाले की, जी मूल्ये प्रभू रामाने आपल्या शब्दात, विचारात, आपल्या शासनात, प्रशासनात रुजवली. ते सबका साथ-सबका विकासाचे प्रेरणास्थान आणि 'सबका विश्वास-सबका प्रयास'चा आधार आहेत.
6/10

स्वातंत्र्याच्या अमृततुल्य काळात देशाने आपल्या परंपरेचा अभिमान बाळगून गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडायला हवे. भगवान राम कोणाचीही साथ सोडत नाहीत, असंही ते म्हणाले आहेत.
7/10

पंतप्रधान मोदी म्हणाले, भगवान रामाच्या आदर्शांचे पालन करणे हे आपल्या सर्व भारतीयांचे कर्तव्य आहे.
8/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.
9/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भगवान श्रीराम यांचा राज्याभिषेक केला.
10/10

यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही भारतातील तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा सर्वांगीण दृष्टीकोन समोर ठेवला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवामध्ये देशाने आपल्या वारशाचा अभिमान बाळगावा आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त व्हावे. राम कोणाचीही साथ सोडत नाही, राम कर्तव्यापासून तोंड फिरवत नाही.
Published at : 23 Oct 2022 08:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
विश्व
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
