लोटे MIDC तील डॉक्टर खान कंपनीमध्ये भीषण स्फोट, 9 कर्मचारी जखमी, 5 जणांची प्रकृती गंभीर
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. लोटे MIDC मधील डॉक्टर खान कंपनीमध्ये हा भीषण स्फ़ोट झाला आहे.
Ratnagiri Lote MIDC Explosion : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना (Ratnagiri Lote MIDC Explosion) घडली आहे. लोटे MIDC मधील डॉक्टर खान कंपनीमध्ये हा भीषण स्फ़ोट झाला आहे. या स्फ़ोटात 9 कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, स्फ़ोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटास्थळी दाखल झाले आहेत. ही घटना नेमकी कशी घडली, याबाबतची माहिती मिळाली नसली तरी पोलिसांनी तपास सुरु केल आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजता ही स्फोट झआल्याची घटना घडली आहे. इथाईल सिलीकेट प्रॉडक्ट्सचे प्रोडक्शन सुरु असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटात 9 कर्मचारी जखमी झाले असून यातील 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केल्याची माहिती मिळत आहे.
1 मार्चला नागपूरमध्येही एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट, 19 जणांचा मृत्यू
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव इथं देखील 1 मार्च 2026 रोजी सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट (Nagpur SBL Company Blast) झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 19 निष्पाप कामगारांचा नाहक बळी गेला आहे. अशातच या प्रकरणाचा चौकशीत आता धक्कादायक सत्य समोर आलं आहे. एसबीएल कंपनीकडून (SBL Company Blast) सरकारी नियमांना केराची टोपली दाखवत सुरक्षा नियमाचे थेट उल्लंघन करण्यात आल्याची धक्कादायक बाब तपास अहवालातून समोर आली आहे. पेसो (PESO) (पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन) आणि डिश (डायक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड हेल्थ) कडून प्राथमिक अहवालात कंपनीवर नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात पोलीसांकडून 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कंपनीचा मालक आलोक चौधरी हा अद्याप फरार आहे. पोलीसांच्या तीन पथकांकडून अलोक चौधरीचा शोध सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nagpur Blast News: नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
महत्त्वाच्या बातम्या





















