एक्स्प्लोर
Heeraben Modi Passed Away : पंतप्रधान मोदी यांना मातृशोक, आई हिराबेन मोदी यांचं वयाच्या 100 व्या वर्षी निधन
PM Modi Mother Passes Away : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे.

PM Modi Mother Heeraben Modi Passed Away
1/11

हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
2/11

काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
3/11

अहमदाबाद येथील यू.एन.मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
4/11

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी भावूक ट्वीट करत आईला श्रद्धांजली दिली आहे.
5/11

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'एका गौरवशाली शतकाचा प्रवास देवाच्या चरणी विसावला. आईमध्ये मला नेहमीच त्रिमूर्तीचा अनुभव व्हायचा, ज्यामध्ये एका तपस्वीचा प्रवास आहे. त्यांचे जीवन निस्वार्थी कर्मयोगी आणि मूल्यांसाठी वचनबद्ध होते.'
6/11

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी जीवनात खूप संघर्ष केला आहे.
7/11

हिराबेन यांची दिनचर्या त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून अतिशय शिस्तबद्ध होती.
8/11

हिराबेन यांचा जन्म पालनपूरमध्ये झाला, लग्नानंतर त्या वडनगरला राहायला आल्या.
9/11

हिराबेन यांचे लग्न झाले तेव्हा त्या अवघ्या 15 ते 16 वर्षाच्या होत्या.
10/11

घरची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. पण त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी इतरांच्या घरी काम करत पैसे कमावले आणि मुलांना शिक्षण दिले.
11/11

फी भरण्यासाठी त्यांनी कधीही कोणाकडून पैसे घेतले नाहीत. हिराबांची इच्छा होती की आपल्या सर्व मुलांनी शिक्षण घ्यावे.
Published at : 30 Dec 2022 06:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
व्यापार-उद्योग
जॅाब माझा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
