एक्स्प्लोर
Railway Knowledge : तु्म्हाला माहिती आहे का भारतीय रेल्वेचे नाव कसे ठरवले जाते ? याबद्दल जाणून घ्या !
भारतीय रेल्वे इतका मोठा कारभार सांभाळण्यासाठी रेल्वेच्या विधा वाढवण्यावर आणि आधुनिकीकरणावर जास्त भर देत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? भारतीय रेल्वेची नाव कसं ठरवली जातात?

Railway Knowledge:
1/11

Railway Knowledge : भारतीय रेल्वेने दररोज लाखो-कोटी लोक प्रवास करतात. जगातील सर्वाधिक मोठे रेल्वेचे जाळे म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. भारतीय रेल्वेचा जगात चौथा क्रमांक आणि आशिया खंडात दुसऱ्या क्रमांक आहे.
2/11

भारतीय रेल्वेकडे हजारो मालगाड्या आहेत. या मालगाड्यांमुळे देशातील इतर राज्यात माल वाहून नेण्यासाठी मदत होते. यासाठी लाखो कमर्चारी काम करत असतात. भारतीय रेल्वेच्या सेवेत जवळपास 10 लाख कर्मचारी कार्यरत आहेत.
3/11

दररोज कोट्यावधी लोक भारतीय रेल्वेने प्रवास करत असतात. यासाठी जवळपास 13 हजार रेल्वे गाड्या सेवा देत असतात. यासाठी हजारो हजारो रेल्वे स्टेशन्सची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेची 7 हजारपेक्षा जास्त रेल्वे स्टेशन्स आहेत.
4/11

भारतीय रेल्वे इतका मोठा कारभार सांभाळण्यासाठी रेल्वेच्या सुविधा वाढवण्यावर आणि आधुनिकीकरणावर जास्त भर देत आहे.
5/11

तुम्ही अनेक रेल्वेची नाव ऐकली असतील, तुम्हाला काही नाव तोंडपाठही असतील.पण आज आपण भारतीय रेल्वेची नाव कशी ठरवली जातात. यामागचा फार्मुला जाणून घेणार आहोत.
6/11

कोणत्याही रेल्वेचे नाव ठरवताना आधी त्या त्या देशातील राज्य आणि शहराचा विचार केला जातो. जसे की, दोन राज्यांना जोडणारी रेल्वे राजधानी एक्सप्रेसच्या नावाने ओळखली जाते.
7/11

तुम्ही शताब्दी, दुरंतो आणि चेन्नई एक्सप्रेसने प्रवास केला असेल, तर तुम्हाला माहिती असेल की या रेल्वे सर्वाधिक चांगल्या दर्जाच्या सुविधा देतात. या रेल्वेचा प्रति तास वेगही खूप जास्त असतो.
8/11

शताब्दी एक्सप्रेस देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांच्या 100 व्या जन्मदिवसानिमित्त 1989 साली रेल्वे सुरू करण्यात आली आहे. यामुळे शताब्दी एक्सप्रेस असं नाव ठेवण्यात आले आहे.
9/11

दुरंतो एक्सप्रेस म्हणजे अखंडपणे धावणारी रेल्वे. ही रेल्वे खूप कमी स्टेशन्सवर थांबते. त्यामुळे या रेल्वेला दुरंतो एक्सप्रेस असं म्हटले जाते.
10/11

रेल्वेची नाव ठरवताना भारतीय रेल्वेने एक फॉर्मुला वापरला आहे. जिथून रेल्वे सुरू होते आणि जिथं प्रवास संपतो त्या शहराचे नाव दिले जाते. जसे की, चेन्नई-जयपुर एक्सप्रेस, कोटा-पटना इत्यादी.
11/11

याशिवाय तेथील परिसराची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख लक्षात घेतली जाते आणि रेल्वेची नाव ठरवली जातात. जसे की, गोल्डन टेम्पल एक्सप्रेस, काशी-विश्वनाथ एक्सप्रेस आणि वैशाली एक्सप्रेस इत्यादी.
Published at : 24 May 2023 05:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
