एक्स्प्लोर
G20 Summit 2023 : भारतात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांची खास सोय! सोने-चांदीची भांडी, पारंपारिक खाद्यपदार्थांची मेजवानी
G20 Summit 2023 Delhi : जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणाऱ्या विदेशी पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
Silver and Gold Utensils G20 Summit 2023
1/12

भारताचा सांस्कृतिक वारसा दाखवण्यासाठी सोने आणि चांदीचा मुलामा दिलेल्या भांड्यांमध्ये पाहुण्यांना जेवण दिलं जाईल. (PC:PTI)
2/12

जयपूरस्थित मेटलवेअर फर्म आयआरआयएस इंडियाचे सीईओ राजीव पबुवाल यांनी ही माहिती दिली आहे. (PC:PTI)
3/12

आयआरआयएस इंडियाच्या सीईओने या भांड्यांची खासियत सांगितली आहे. (PC:PTI)
4/12

राजीव पबुवाल यांनी सांगितलं की, ''आम्ही वेगवेगळ्या संकल्पनेनुसार थाळी बनवल्या आहेत. शाही राजे-महाराज ज्या पद्धतीच्या भांड्यामध्ये जेवायचे त्याप्रमाणे आम्ही थाळी तयार केली आहे.'' (PC:PTI)
5/12

भारतात 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 परिषद (G20 Summit 2023) पार पडणार आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे ही परिषद पार पडणार आहे. (PC:PTI)
6/12

परदेशी पाहुण्याच्या स्वागतासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. नवी दिल्लीमध्ये सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेतही मोठा बदल करण्यात आला आहे. (PC:PTI)
7/12

परदेशी पाहुण्याच्या राहण्या आणि खाण्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. (PC:PTI)
8/12

image जी-20 परिषदेसाठी भारतात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण दिलं जाणार आहे. तसेच त्यांच्या जेवणासाठी खास मेन्यूही तयार करण्यात आला आहे. (PC:PTI)
9/12

जी-20 परिषदेसाठी भारताची राजधानी नवी दिल्ली एखाद्या नववधूप्रमाणे सजली आहे. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. (PC:PTI)
10/12

भारतीय कला आणि संस्कृती दाखवणारे देखावे दिल्लीत जागोजागी पाहायला मिळत आहेत. (PC:PTI)
11/12

जी-20 साठी येणाऱ्या पाहुण्यासाठी खास भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थांचा बेतही करण्यात आला आहे. परदेशी पाहुण्यांना अगदी राजेशाही थाटात सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण वाढलं जाईल. (PC:PTI)
12/12

भारतीय संस्कृतीची झलक दाखवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी सुरु आहे. (PC:PTI)
Published at : 08 Sep 2023 05:35 PM (IST)
आणखी पाहा























