एक्स्प्लोर

Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूरातून मोठी बातमी. जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला.

कोल्हापूर: राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक असताना कोल्हापूरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील (karvir assembly constituency) जनसुराज्य पक्षाचे उमेदवार संताजी घोरपडे (Santaji Ghorpade) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, संताजी घोरपडे हे रविवारी रात्री प्रचार संपवून आपल्या सहकाऱ्यांसह कोल्हापूरकडे (Kolhapur) परतत होते. त्यावेळी मनवाड येथे सहा ते सात लोकांनी त्यांची गाडी थांबवली. जनसुराज्य पक्षाचे (Jan Surajya Party) कार्यकर्ते आपल्याला भेटायला थांबले असतील, असे सुरुवातीला संताजी घोरपडे यांना वाटले. त्यामुळे ते आपल्या सहकाऱ्यांसह या लोकांची विचारपूस करण्यासाठी गाडीतून खाली उतरले. त्यावेळी बाहेरील लोकांनी काठ्या आणि भाल्यासह संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला चढवला.

संताजी घोरपडे यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये संताजी घोरपडे यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून आणि हातामधून रक्त वाहत होते. मारेकऱ्यांचा हल्ला संताजी घोरपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कसाबसा परतावून लावला. त्यानंतर हल्लेखोर रस्त्यालगत असणाऱ्या शेतात पळून गेले. जाताना त्यांनी संताजी घोरपडे यांच्या गाडीवरही दगडफेक केली.

यानंतर संताजी घोरपडे आणि त्यांचे सहकारी कोल्हापूरमध्ये परतले. यानंतर संताजी घोरपडे यांच्या डोक्यातून आणि हातातून रक्त वाहत असतानाचे फोटो कोल्हापूरमध्ये व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी कळे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संताजी घोरपडे यांच्यावर हल्ला करणारे लोक कोण होते, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. यंदा करवीर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. संताजी घोरपडे हे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील हल्ला राजकीय हेतूने प्रेरित आहे का, याबद्दल चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे संताजी घोरपडे आज पुन्हा प्रचारात उतरणार का, हे बघावे लागेल. संताजी घोरपडे यांच्यावरील हल्ल्यामुळे कोल्हापूरचे राजकारण शेवटच्या दिवशी तापण्याची शक्यता आहे. 

घोरपडे यांच्यावरील या हल्ल्यामागील सूत्रधार कोण, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. संताजी घोरपडे यांच्या डोक्यावर, हातावर काही वार झाले आहेत. त्यांचे शरीरातून रक्त वाहत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा

बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
संजय राऊत आमचा विषय नाही अन् राहणारही नाही; छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू; नाना पटोलेंची टीका
Sharad Pawar : शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
शरद पवारांनी अमित शाहांच्या तडीपारीच्या वेळचा मुद्दा उकरून काढला, म्हणाले, तेव्हा मुंबईत बाळासाहेबांकडे...
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचं कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Embed widget