एक्स्प्लोर

Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील

Devendra Fadnavis will be Mahayuti CM: भाजपने यंदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे ठरवले आहे. अमित शाह यांचे वक्तव्य पाहता तेच होणार, जयंत पाटलांचा दावा

मुंबई: मला आता मुख्यमंत्रीपदामध्ये रस नाही, मी या रेसमध्ये नाही, असं देवेंद्र फडणवीस बोलत असले तरी भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पत्ता कट करुन फडणवीसांना मुख्यमंत्री (Maharashtra CM) करायचे हे ठरवले आहे, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. त्यांनी एका मराठी बेव पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले. खरं म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना फोडताना देवेंद्र फडणवीस यांना स्वत:ला मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. त्यावेळी वरुन आदेश आला, तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले होते. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री व्हायचंय, हे सत्य आहे. अन्यथा, 'मी पुन्हा येईन' ही घोषणा कशातून आली, असा सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केला. 

अमित शाह यांनी तीनवेळा सांगितलं आहे की, पुढचं सरकार भाजपचं म्हणजे मुख्यमंत्री भाजपचा. देवेंद्रजी नेतृत्व करतील. अमित शाह ही गोष्ट बोलतात, याचा अर्थ हे मोदींनाही मान्य आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा पत्ता कट करुन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं हे ठरलेलं आहे. पण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा करायला भाजपचे (BJP) धाडस होत नाही. तसे केल्यास एकनाथ  शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) नाराज होऊ शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी काहीशी सॉफ्ट भूमिका घेतली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

मुख्यमंत्रीपद न मिळाल्यास एकनाथ  शिंदे आणि अजित पवार यांना नाराज होण्याचा कोणताही हक्क नाही. कारण त्यांनी भाजपचं मांडलिकत्त्व स्वीकारलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे की नाही, हे लहान पोरगंही सांगेल. राज्यात महायुतीची (Mahayuti) सत्ता येणार नाही. पण चुकून महायुती सत्तेत आली तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, सत्ता न आल्यास देवेंद्र फडणवीस हेच विरोधी पक्षनेते असतील, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा: 

आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...

Supriya Sule: शरद पवारांनंतर सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर मोठं विधान; मनातली इच्छा सांगितली!

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget