एक्स्प्लोर

Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर

Maharashtra Assembly Election 2024 :  जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराची आज सांगता होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. त्यातच आता जळगावमधून (Jalgaon News) धक्कादायक बातमी समोर येत आहे.  जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर अज्ञाताकडून आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलीस तपास सुरु आहे. 

तीन रिकामी काडतुसे आढळली

अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या. यामुळे मोठा आवाज झाल्याने शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन खडबडून जागे झाले. त्यांनी याबाबत तपास केला असता काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तीन रिकामी काडतुसे आढळून आली. 

पोलीस संरक्षण मिळणार 

दरम्यान, शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन हे AIMIM पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना अधिकृत मिळाली नसल्यामुळे ते अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अहमद हुसैन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक देखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस गोळीबार करणाऱ्यांचा कसून शोध घेत आहेत. तर अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांना पोलीस संरक्षण मिळणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई

Gondia Crime : ड्युटीवर असताना पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आयुष्य संपवलं, सहकाऱ्यांवर मानसिक त्रास दिल्याचे आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha : निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
kannad vidhan sabha: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...
Santaji Ghorpade attack: मोठी बातमी: कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
कोल्हापुरात जनसुराज्यचे उमेदवार संताजी घोरपडेंवर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
विरोधकांकडून प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक रॅलीला परवानगी नाकारली जातेय; भर पत्रकार परिषदेत वारिस पठाण ढसाढसा रडले
Embed widget