एक्स्प्लोर

Kannad Election 2024: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!

Maharastra Kannad Vidhan Sabha Election 2024: आई म्हणाली होती परत आलीस तर तिरडीवरच ये, एकटी येऊ नकोस. नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं.

छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव (Sanjana Jadhav) यांना रविवारी प्रचारसभेत बोलताना अश्रू अनावर झाले. यावेळी संजना जाधव यांनी त्यांचे पती हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे केवळ एका लेकीचा बाप होता म्हणून शांत राहिले, असेही संजना जाधव यांनी म्हटले. कन्नड मतदारसंघात (Kanna अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांच्यात लढत आहे. या पार्श्वभूमीवर संजना जाधव यांचे प्रचारसभेतील भावनिक भाषण प्रचंड गाजत आहे. 

संजना जाधव यांनी प्रचारसभेत सांगितले की, हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मी खूप काही सोसले. मी लग्न होऊन एका महिन्यात घरी आले. वडिलांना याबाबत सांगितलं तर म्हणाले, तुला एक मूल होऊ दे, मूल झाल्यावर  हा माणूस सुधारेल. मूल झाल्यावर माझे वडील म्हटले, चाळिशी झाली की माणूस सुधरत असतो. चाळिशी झाली, जे सहन केलं त्याचा मोबदला मला मिळाला नाही पण माझ्या जागेवर कोण आणलं हे तुम्हाला माहिती आहे. यानंतर पुढे बोलताना संजना जाधव यांना रडू कोसळले. 

माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप झाले. परंतु, आम्ही सहन केले, कारण एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असतात. मुलाचा बाप असता तर रस्त्यावर उतरला असता. मुलीचा बाप होता म्हणून शांत बसला. आपली मुलगी तिकडे नांदतेय, म्हणून ते काहीच बोलले नाहीत. आपले संस्कारच आहेत, आई म्हणाली होती, आता तू घरातून जात आहेत. तू परत येशील तेव्हा तिरडीच आली पाहिजे, तू एकटी नाही आली पाहिजे, असं आईने म्हटलं होतं. त्याप्रमाणे मी संसार केला, पण मला काय मिळालं. मी आतापर्यंत कधीच रडले नाही, कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही, हे गाव माझं म्हणून भरुन आलं. मी काय केलं आणि काय केलं नाही हे सगळ्यांना माहिती आहे, असे संजना जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा

आधी शरद पवार म्हणाले थोरातांकडे नेतृत्त्व, आता जयंत पाटीलही रेसमध्ये, मुख्यमंत्रिपदावर बोलताना थेट म्हणाले; इच्छा तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
'75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्जVasai Jewellery Shop Robbery : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलंMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 7.30 AM | 11 Jan 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
'75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget