एक्स्प्लोर

Beed Vidhan Sabha Election: निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला

Beed Vidhan Sabha Election 2024: परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष पेटला आहे. बीड जिल्ह्याचा बिहार होतोय, धनंजय मुंडेंना निवडणूक अधिकाऱ्यांचं पाठबळ मिळतंय, असा आरोप शरद पवार गटाने केला आहे.

Parli Vidhan Sabha Elections 2024 : बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष चांगलाच पेटला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात उभे ठाकलेले उमेदवार राजेसाहेब देशमुख (Rajesaheb Deshmukh) यांनी धनंजय मुंडेंना आव्हान देत गंभीर आरोप केले आहेत. बीड जिल्ह्याचा बिहार होतोय, धनंजय मुंडेंना निवडणूक अधिकाऱ्यांचं पाठबळ मिळतंय, असा आरोप शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे.

मतदानाची वेब कास्टिंग करावी - राजसाहेब देशमुख 

परळी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे उभे आहेत, तर शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना परळीतील हा संघर्ष अधिक पेटला आहे. राज्य निवडणूक आयोगाने परळी मतदारसंघात स्वतः लक्ष घालून बूथ एजंटवर निर्बंध घालावे, मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरा छेडछाड करून बोगस मतदानाला रोख लावून मतदानाची वेब कास्टिंग करावी, अशी मागणी राजसाहेब देशमुख यांनी केलीय.

निवडणूक अधिकाऱ्यांचं धनंजय मुंडेंना पाठबळ - राजसाहेब देशमुख 

मी मॅनेज उमेदवार असेल तर धनंजय मुंडे यांनी वैद्यनाथाच्या पिंडीवरील बेल उचलावा असे थेट आव्हान देशमुख यांनी दिलं. मी मॅनेज नसून त्यांचा लाभार्थी नाही. धनंजय मुंडे निष्क्रिय असून त्यांचं मतदारसंघात कोणतंही काम नाही. तसेच बीड जिल्ह्याचा बिहार होत असल्याचं म्हणत अधिकारी देखील याला पाठबळ देत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.

ही निवडणूक अंडरकरंट - राजेसाहेब देशमुख

धनंजय मुंडेंकडून मतदारसंघात कोणतीही मोठी सभा घेण्यात आली नसली तरी स्वतः शरद पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यासाठी मोठी सभा घेऊन थेट धनंजय मुंडेंना लक्ष केलं होतं. परंतु, याला धनंजय मुंडेंनी यानंतर कॉर्नर बैठकाच्या माध्यमातूनच उत्तर दिलं. शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे मतदारसंघ पिंजून काढून मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत. ही निवडणूक लोकांनी हातात घेतली असून अंडरकरंट आहे, लोकांना इथे शांती पाहिजे, कायद्याचं राज्य पाहिजे, येथील अराजकता बंद करायची आहे, असं ते म्हणतात. तसेच, लोकांना निवडणूक विकासाच्या टप्प्यावर घेऊन जायचं असल्याचंही राजेसाहेब देशमुख यांनी म्हटलं आहे.         

हेही वाचा:

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?
नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?
Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?
भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?
Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
महापशुधन एक्स्पोसाठी 3 कोटींचा मंडप, स्वत:वरील गाण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
भारत-अमेरिका व्यापारी करार अंतिम टप्प्यात; भारतीय टीम पुढील आठवड्यात US दौऱ्यावर 
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
बुलेटवरुन मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
Embed widget