एक्स्प्लोर

टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील आणखी एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, त्या दिवशी पोलिस आणि सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर असल्याने त्यांना मतदान करणे शक्य नसते. या पार्श्वभूमीवर टपाली मतदानाद्वारे पोलिसांना मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र यादरम्यान टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील आणखी एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टपाली मतदानाचा फोटो गावाकडे व्हॉट्सअॅप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शिवडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाया विरोधात कलम 223 सह लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 128 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पोलीस कर्मचारी शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला शिपाई रियाझ पठाण हा मूळचा साताराच्या कोरेगावचा आहे.

नेमकं प्रकरण काय?

14 नोव्हेंबर रोजी 257 कोरेगांव विधानसभा मतदार संघ सातारासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे  टपाली मतदान घेण्यात आले. यावेळी टपली मतदान केल्यानंतर पोलिस कर्मचारी रियाझ याने मतपत्रिकेचा फोटो काढून गावी नातेवाईक आणि मित्र परिवाराला पाठवला. या व्हायरल झालेल्या टपाली मतपत्रिकेची चौकशी केल्यानंतर ही टपाली मतपत्रिका 184 भायखळा विधानसभा पोस्टल बॅलेट फॅसिलिटेशन सेंटर येथून प्राप्त झाल्याचे समोर आले. पुढील तपासात मिळालेल्या माहितीनुसार हा अर्ज मुंबई मतदार यादी क्रमांक 47 मधील या पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आला होता. पोलीस चौकशीत संबधित पोलीस कर्मचाऱ्याने गुन्ह्याची कबूली दिली. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी गावदेवी पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारे टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्याप्रकरणी एका पोलिस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

6 हजार 567 पोलिसांनी बजावला मतदानाचा हक्क-

आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शहरातील 6 हजार 567 पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मुंबई शहर, जिल्ह्यातील 10 मतदारसंघांत सहा हजार 567 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान कुलाबा मतदारसंघात झाले असून, तेथे एक हजार 879 जणांनी मतदान केले. त्याखालोखाल वडाळा मतदारसंघात एक हजार 407 पोलिसांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मलबार हिलमध्ये एक हजार 242, धारावीत 274, सायन कोळीवाड्यात 324, वरळीत 42, भायखळ्यामध्ये 764, मुंबादेवीमध्ये 517 आणि शिवडी मतदारसंघात 118 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान केले आहे. भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा, माहीम मतदारसंघांत शनिवारपर्यंत निवडणूक कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची मुदत होती. धारावी मतदारसंघात केवळ 14 नोव्हेंबर रोजीच टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, तर शिवडी वडाळा, वरळी मतदारसंघां 17 नोव्हेंबरपर्यंत टपाली मतदान सुरु होते.

संबंधित बातमी:

Pankaja Munde: मला सभा करायला लावताय, मग महामंडळ तरी द्या; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narendra Bhondekar Vs Sunil Prabhu Exclusive | मंत्रिपदावरून नाराज, दोन्ही शिवसेनेची भूमिका काय?Nana Patole Full PC : ओबीसी की बात करेगा; उसका पत्ता भाजप से कट होगा - नाना पटोलेChitra Wagh on Sanjay Rathod | संजय राठोड यांना माझा विरोध कायम, चित्रा वाघ यांचा निशाणाVidhansabha Winter Session Nagpur : हिवाळी अधिवेशनात विधानसभेचं कामकाज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
भोंडेकरांचा राजीनामा, शिवतारेंचा हल्लाबोल, आता एकनाथ शिंदेंचा आणखी एक आमदार मंत्रिपद न दिल्याने नाराज!
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
धनंजय मुंडेंचे खास, काय आहे राजकीय इतिहास; संतोष देशमुख प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड कोण?
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांचा पत्ता कट; वळसे पाटलांसह दिग्गजांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही
Chhagan Bhujbal : मोठी बातमी,  छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर धुडकावली, नाशिकला जाताना सगळं स्पष्ट केलं...
छगन भुजबळ नागपूरहून थेट नाशिकला रवाना, राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यसभेची ऑफर नाकारली, कारण...
Somnath Suryawanshi Parbhani: सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, समोर आलं मृत्यूचं धक्कादायक कारण
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
Embed widget