एक्स्प्लोर
कोरडा पडलेला 'रामलिंगचा धबधबा' वाहिला, पहिल्याच पावसानं खुललं निसर्ग सौंदर्य
dharashiv waterfall of ramling
1/7

धाराशिव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून आता पेरणीच्या तयारीला लागला आहे.
2/7

धाराशिव जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण असलेलं येडशी येथील रामलिंग मंदिर पुरातन आणि ऐतिहासिक आहे. या मंदिर परिसरात श्रावण महिन्यात दरवर्षी निसर्ग सौंदर्याचा देखावा डोळे दिपवणारा असतो
3/7

रामिलंगचा धबधबा म्हणून हे थंड हवेचं ठिकाण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून लाखो भाविक व पर्यटक येथील धबधबा पाहायला गर्दी करत असतात.
4/7

रामलिंगचा हा धबधबा यंदा पहिल्याच पावसानंतर पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे, बालाघाटाच्या पर्वतरांगेत वसलेल्या मराठवाड्यात मलिंगला मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते.
5/7

याठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. या काळात येथील हा धबधबा पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरतो. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हा धबधबा आता मोठ्या जोमानं सुरू झाला.
6/7

दरवर्षी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी, पर्यटनासाठी येथे येत आहेत. या ठिकाणी महादेवाचे पुरातन मंदीर असून हे प्रसिद्ध निसर्ग पर्यटनस्थळ आहे.
7/7

विशेष म्हणजे उन्हाळ्यात कोरडा पडलेला हा धबधबा आता वाहू लागल्याने पर्यटक आणि धाराशिवकरांनी आनंद व्यक्त केला आहे
Published at : 11 Jun 2024 04:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























