एक्स्प्लोर
Heat Wave: कोंबड्यांनाही उन्हाचा फटका, पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत
Heat Wave: गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा (Heat) पारा वाढतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, याचा फटका माणसांप्रमाणे प्राण्यांना देखील बसतोय.
Heat Wave: कोंबड्यांनाही उन्हाचा फटका, पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत
1/9

वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिक (Poultry Farm Business) अडचणीत आले असून, उन्हामुळे कोंबड्यांचा मृत्यू होत आहे.
2/9

गतवर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पण यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून, 50 कोंबड्या रोज मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र आहे.
3/9

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तापमान काही ठिकाणी 42 अंशां पर्यंत पोहोचले आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. सोबतच याचा फटका सध्या पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे.
4/9

उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील पाचोड, लिंबगाव, खादगांव, कडेठाणसह परिसरातील पोल्ट्री व्यवसायिकांची चिंता वाढली आहे.
5/9

तापमान 40 अंशाच्या पुढे गेल्याने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहेच, सोबतच अंडी उत्पादनातही घट झाली आहे.
6/9

उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे म्हणून पाचोड परिसरातील व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मच्या छतावर गवत टाकले आहे.
7/9

वाढत्या उन्हापासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी नारळाच्या फांद्याही अंथरल्या जात आहेत. तर आता पोल्ट्री फार्ममध्ये जागोजागी फोगर बसविले असून, फॅन देखील लावण्यात आले आहे.
8/9

गतवर्षी दिवसाकाठी 15 ते 20 कोंबड्यांचा मृत्यू होत होता. पण यंदा वातावरणात मोठा बदल झाला असून, हे प्रमाण 50 पर्यंत पोहचले आहे.
9/9

उन्हाळ्यात कोंबड्यांची मागणी घटते, त्यामुळे कंपनीकडून पक्षांची उचल वेळेत होत नाही. त्याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना बसतो आहे. त्यामुळे सध्या नैसर्गिक संकटा सोबतच कंपनी मुळेही पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.
Published at : 23 May 2023 12:56 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे


















